Breaking News
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का
  • हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत बेपत्ता झालेल्या बालकाचा संशयास्पद मृत्यू
  • लग्नसोहळ्यात थरार! पुतण्याच्या हल्ल्यात काका-चुलत भावाचा खून
  • इराणची विनाशकारी योजना; गूगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉनची कार्यालये उडवण्याची धमकी
  • IAS तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल '24 वेळा' बदली
  • नासाची आर्टेमिस-2 मोहीम; 54 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्र मोहिमेकडे
  • 'कूपर कॉनोली' ठरला पंजाब किंग्सच्या विजयाचा हिरो

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पालिका आग

हिंगोली पालिकेच्या कचरा डेपोची उफाळली आग

Hingoli Municipal Fire: हिंगोलीतील कचरा डेपोला 22 मार्चला आग लागली. अग्निशमन दलाने आग विझविल्यानंतर पुन्हा 6 एप्रिलला आग उफाळली. यामुळे शेकडो झाडे व महागडे विलगीकरण कचरा नष्ट


हिंगोली पालिकेच्या कचरा डेपोची उफाळली आग

Hingoli Municipal Fire |

आगीमध्ये शेकडो झाडे नष्ट व विलगीकरण कचराही जळाला

हिंगोली (Hingoli Municipal Fire) : शहराजवळील लिंबाळा मक्ता भागामध्ये नगर परिषदेचा कचरा डेपो असुन २२ मार्चला या कचरा डेपोला आग लागली होती. आग विझविण्याकरीता हिंगालीसह कळमनुरी, वसमत, सेनगाव या नगर परिषद, नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. ही आग धुमसत असताना पुन्हा एकदा ही आग उफाळल्याने शेकडो झाडे व विलगीकरण केलेला कचराही जळाला आहे. 

२२ मार्चला नगर पालिकेच्या कचरा डेपोला आग लागली होती. जवळपास ४० ते ५० वेळा अग्निशमन दलाच्या बंबाने पाण्याचा मारा करून ही आग विझविली होती. कचरा डेपोला लागलेली आग पुर्णत: विझल्याचा दावाही स्वच्छता विभागाने केला होता. परंतु ही (Hingoli Municipal Fire) आग अधून मधून धुमसत असताना ६ एप्रिल सोमवार रोजी पुन्हा एकदा ही आग उफाळून आल्याने अग्निशमन दलाचे बंब पाठविण्यात आले. 

दरम्यान या (Hingoli Municipal Fire) आगीमध्ये कचरा डेपोमध्ये लावण्यात आलेले शेकडो वृक्ष जळाले. तसेच जवळपास २ कोटी रुपये खर्चातून तयार करण्यात आलेले बायोगॅस व विलगीकरण केलेला कचराही जळाल्याने याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related to this topic: