Petrol-Diesel Rules: हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी २० मे रोजी पेट्रोल आणि डिझेल बाटलीत किंवा कॅनमध्ये देण्याची कटेकोरता जपण्याचा आदेश दिला
हिंगोलीत कॅन, ड्रम किंवा बाटलीत पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गुरुवारी पेट्रोल पंपा समोरील रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा
हिंगोली (Petrol-Diesel Rules) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कॅन, ड्रम किंवा बाटलीत पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी घातल्याने नियमांचे पालन सुरू झाले आहे. प्रत्येकाला दोन हजाराचे डिझेल देण्यात यावे असेही आदेशात नमूद असल्याने शेतकऱ्यांना २० मे बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत दोन हजारांच्या डिझेलसाठी पाचशे रुपयांचा खर्च लागत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शहरातील विविध पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली होती शहरातील अनेक रस्त्यांवर देखील वाहने उभी असल्याचे चित्र होते.
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंप (Petrol-Diesel Rules) चालकांनी बाटली किंवा कॅनमध्ये इंधन देऊ नये असे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले असून २१ मे गुरुवारपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पेट्रोलपंप चालकांना दिल्या आहेत. पेट्रोल किंवा डिझेल प्लास्टिक बाटलीत किंवा कॅनमध्ये नेणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे पंपांवर केवळ वाहनांनाच इंधन पुरवठा करावा, अशा स्पष्ट सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.
कॅन, ड्रम किंवा बाटलीत पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे तसेच दोन हजार रुपयांचे डिझेल देण्याच्या सूचना दिल्या आहेत मात्र दोन हजारांचे डिझेल घेण्यासाठी पाचशे रुपयांचा खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधित पंप धारकावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिला आहे. या आदेशानंतर 20 मे रोजी सकाळ पासूनच हिंगोली शहरातील बऱ्याच पेट्रोल पंपावर रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या परिणामी वाहतूक व्यवस्था ही कोलमडली होती.