Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ

बळीराम सिरस्कार

पातुर तालुक्यात गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान

Baliram Sirskar: पातुर तालुक्यात गारपीटीमुळे कांदा, आंबा और अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाकडे नुकसानीचा अहवाल तसेच आर्थिक मदतीची मागणी केली गेली आहे.


पातुर तालुक्यात गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान

Baliram Sirskar |

तात्काळ सर्वेक्षणाची मागणी: बळीराम सिरस्कार

पातुर (Baliram Sirskar) : तालुक्यात सोमवारी दुपारी व सायंकाळी झालेल्या वादळी अवकाळी पावसासह (Unseasonal rain) गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गारपीटीमुळे कांदा, आंबा, फळबागा तसेच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील शास्त्री सावरगाव, बाभूळगाव, चतारी आदी भागांमध्ये गारपीट झाली असून अनेक शेतांतील पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. यासोबतच बाळापूर विधानसभा मतदारसंघातील इतरही अनेक गावांमध्ये वादळी पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला आहे.

या (Unseasonal rain) पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तात्काळ प्राथमिक पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार (Baliram Sirskar) यांनी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे. दरम्यान, तालुक्यातील इतर गावांनाही अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने शेतकरी चिंतेत असून प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Related to this topic: