Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सेनगावात शोककळा

गुढीपाडव्याच्या दिवशीच तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Electric Shock Youth Died: शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये विद्युत खांबात वीज प्रवाह उतरल्याने, त्याला स्पर्श होऊन धुरपत नागोराव इंगोले या २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.


गुढीपाडव्याच्या दिवशीच तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Electric Shock Youth Died |

विद्युत खांबात वीज प्रवाह उतरल्याने घडली दुर्दैवी घटना
प्रभाग १४ मधील इंगोले कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

सेनगाव (Electric Shock Youth Died) : नव्या वर्षाची सुरुवात आनंदाने साजरी होत असतानाच, सेनगाव शहरात आज एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये विद्युत खांबात वीज प्रवाह उतरल्याने, त्याला स्पर्श होऊन धुरपत नागोराव इंगोले या २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सणासुदीच्या दिवशीच गरीब कुटुंबातील तरुण मुलाचा असा अंत झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गुरुवार, १९ मार्च रोजी सकाळी ९ ते ९:३० च्या दरम्यान ही घटना घडली. धुरपत इंगोले हा तरुण आपल्या घरासमोर उभा असताना, तेथील विद्युत पुरवठा करणार्‍या पोलला त्याचा अचानक स्पर्श झाला. या खांबात आधीच वीज प्रवाह उतरलेला असल्याने धुरपतला (Electric Shock Youth Died) विजेचा जबरदस्त धक्का लागला. धक्क्याने तो ओरडत असतानाच काही वेळात जमिनीवर कोसळला. प्रभागातील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच गल्लीत एकच गोंधळ उडाला. आरडाओरड ऐकून धावत आलेल्या त्याच्या आईला नागरिकांनी आणि महिलांनी प्रसंगावधान राखत पोलपासून दूर रोखले, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धुरपतला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मयत धुरपत हा एका बुटाच्या दुकानात काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. नागोराव इंगोले यांचे कुटुंब अत्यंत कष्टाळू असून, त्यांना दोन मुले होती. धुरपतच्या जाण्याने या गरीब कुटुंबाचा मोठा आधार हिरावला गेला आहे. जिथे घराघरात गुढ्या उभारून आनंद साजरा केला जात होता, तिथे इंगोले कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Electric Shock Youth Died) घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मस्के, बिट जमादार सुभाष चव्हाण, संतोष जाधव यांनी भेट दिली असुन अकस्मात मृत्यू नोंदी ची प्रकीया पोलीस ठाण्यात सुरू आहे.