Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

मानोरा येथे पदवी वितरण समारंभ उत्साहात !

मानोरा येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२४ बॅचसाठी ८ वा पदवी वितरण समारंभ दिनांक १ एप्रिल २०२६रोजी उत्साहात पार पडला.


मानोरा येथे पदवी वितरण समारंभ उत्साहात

Graduation Ceremony |

मानोरा (Graduation Ceremony) : ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक संस्थेच्या एम. एस. पी. आर्ट्स व एल. पी. टी. कॉमर्स कॉलेज, मानोरा येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२४ बॅचसाठी ८ वा पदवी वितरण समारंभ दिनांक १ एप्रिल २०२६रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० ते १०.५० दरम्यान नोंदणीने झाली. त्यानंतर ११ वाजता मान्यवरांच्या आगमनाने व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरविंद इंगोले पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देवेंद्र गवांडे (प्राचार्य, श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय, वनोेजा) तसेच डॉ. राहुल सुर्वे (प्राचार्य, वाय. सी. कॉलेज, मंगरुळपीर) उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव  महादेवराव ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे व आयक्यूएसी समन्वयक डॉ. एम. एन. इक्बाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांनी महाविद्यालयाची प्रगती, शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या यशाबाबत माहिती दिली.

यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ.अविनाश निळे यांनी वाणिज्य शाखेतील अधिष्ठाता, डॉ.ए.वाय.अली यांनी कला अधिष्ठाता तर डॉ. सीमा केसवाणी यांनी विज्ञान अधिष्ठाता म्हणून कार्य पार पाडले. प्रत्येक शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रौप्य पदक प्रदान करण्यात आले त्यामध्ये वाणिज्य शाखेतील कु. मोनिका निरंजन राऊत, विज्ञान शाखेतील केतन एकनाथ चव्हाण आणि कला शाखेतील कौस्तुभ रामेश्वर गावंडे यांना चांदीचे पदक स्वर्गीय संचालक  प्रभाकरराव रोकडे यांच्या स्मृतिप्रत्यर्थ नितीन रोकडे यांचे कडून तसेच स्वर्गीय शामरावजी ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राचार्य डॉ.एन.एस. ठाकरे यांचे कडून देण्यात आले. 

प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पदवी ही यशाची सुरुवात असून कौशल्य विकास व प्रामाणिक प्रयत्नांद्वारे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे डॉ. राहुल सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. अध्यक्षीय भाषणात अरविंद पाटील इंगोले यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयक्यूएसी समन्वयक डॉ.एम.एन. इक्बाल यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: