Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

आ. गोविंद केंद्रे

“माजी आ. गोविंद केंद्रे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार का ?”

MLA Govind Kendre: भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंद केंद्रे यांच्या विधानपरिषद उमेदवारीवर आता तीव्र चर्चा सुरू आहे. त्यांच्या निष्ठेचा आणि राजकीय समीकरण


“माजी आ गोविंद केंद्रे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार का ”

MLA Govind Kendre |

निष्ठेचं बक्षीस की राजकीय समीकरण?
भाजपाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

उदगीर (MLA Govind Kendre) : भाजपातील एकनिष्ठ व जेष्ठ नेते, माजी आमदार गोविंद केंद्रे (MLA Govind Kendre) यांना येणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळणार का, यावरून राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षनिष्ठा, दीर्घ राजकीय अनुभव आणि उदगीरमधील भक्कम जनाधार लक्षात घेता केंद्रे यांना संधी देण्याची मागणी कार्यकर्त्यांतून जोर धरत आहे. गोविंद केंद्रे यांनी १९९६ पासून भारतीय जनता पक्षात अखंड निष्ठेने काम केले आहे. राजकारणात प्रवेश करताना त्यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता. एस. एम. जोशी आणि ना. य. डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकीय वाटचाल सुरू केली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी स्थानिक पातळीवर आपली मजबूत पकड निर्माण केली.

१९९५ मध्ये जनता दलातून विधानसभेची निवडणूक लढवून अल्पमताने पराभव झाला. मात्र १९९६ मध्ये प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्षवाढीसाठी सातत्याने काम केले. ते भाजपाचे लातूरचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या काळात त्यांनी जिल्हा परिषदेत १९ सदस्य निवडून आणत भाजपाला मोठे बळ दिले. त्या वेळी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता असतानाही गोविंद केंद्रे (MLA Govind Kendre) यांनी भाजपाचा झेंडा उंचावला. १९९९ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकून आमदारकी मिळवली. पुढील निवडणुकीत अल्प मताच्या फरकाने पराभव झाला, तरीही त्यांनी प्रदेश सचिव व दोन वेळा उपाध्यक्ष म्हणून पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.ते दिवंगत गोपिनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात, तसेच सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणूनही त्यांची ओळख आहे.

उदगीर हा भाजपाचा बालेकिल्ला असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत गोविंद केंद्रे (MLA Govind Kendre) यांना उमेदवारी देणे हे पक्षासाठी फायदेशीर ठरेल, अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
 
मुंडे निष्ठावंतांना न्याय मिळणार का?

स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राज्यातील भाजपात मोठी उलथापालथ झाली. या प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील वजन वाढले, तर मुंडे यांच्या निकटवर्तीयांचे राजकीय स्थान काहीसे कमी झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रमेश कराड यांना विधानपरिषद, तर भागवत कराड यांना राज्यसभेची संधी मिळाल्याची उदाहरणे दिली जातात. त्यामुळे आता प्रश्न अधिकच टोकदार झाला आहे  मुंडे विचारधारेच्या निष्ठावंतांना यावेळी न्याय मिळणार का?

निर्णय कोणाचा — निष्ठेचा की समीकरणांचा?...
“पक्षासाठी आयुष्य झिजवणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देणे म्हणजे निष्ठेचा सन्मान,” अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. मात्र अंतिम निर्णय घेताना पक्षश्रेष्ठी निष्ठेला प्राधान्य देणार की सध्याच्या राजकीय समीकरणांना, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आता येणारे काही दिवसच ठरवतील गोविंद केंद्रे यांच्या राजकीय भवितव्याला नवी दिशा मिळणार की पुन्हा प्रतीक्षाच?विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार की महामंडळाचे अध्यक्षपदावरच बोळवण होणार हे येणारा काळच सांगणार आहे.

Related to this topic: