Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

शिर्ला ग्रामपंचायत रोजगार सेवक नियुक्ती प्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप; सखोल चौकशीची मागणी

शिर्ला येथील रोजगार सेवक विशाल तात्याराव सोनोने यांची नियुक्ती २२ नोव्हेंबर २०१९ रोजी झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे.


शिर्ला ग्रामपंचायत रोजगार सेवक नियुक्ती प्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप सखोल चौकशीची मागणी

Government Fraud |

प्रशासनाची फसवणूक करून मजुरी लाटल्याचा दावा; तक्रारदार प्रवीण इंगळे आक्रमक

पातूर (Government Fraud) : पातूर तालुक्यातील शिर्ला येथील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या रोजगार सेवकाच्या नियुक्तीवरून नवा वाद पेटला आहे. बनावट कागदपत्रे आणि राजकीय दबावाचा वापर करून ही नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित व्यक्तीने चक्क मजूर म्हणून शासकीय निधी लाटल्याचा खळबळजनक आरोप तक्रारदार प्रवीण प्रल्हाद इंगळे यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

शिर्ला येथील रोजगार सेवक विशाल तात्याराव सोनोने यांची नियुक्ती २२ नोव्हेंबर २०१९ रोजी झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे. मात्र, तक्रारदाराने पुराव्यांसह असा दावा केला आहे की, सदर रोजगार सेवकाने स्वतःच्याच जॉब कार्डवर  सन २०२३ पासून आजतागायत वृक्ष लागवडीच्या कामावर मजूर म्हणून लाखो रुपयांची मजुरी उचलली आहे. नियमानुसार, मजुरी करणारी व्यक्ती रोजगार सेवक पदावर राहू शकत नाही, तरीही हा प्रकार सर्रास सुरू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

प्रवीण प्रल्हाद इंगळे यांची प्रतिक्रिया :

"शिर्ला ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवकाची नियुक्ती करताना सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. संबंधित व्यक्तीने सन २०२३ ते २०२५ या काळात मजूर म्हणून काम करून शासनाची दिशाभूल केली आणि मजुरीचे पैसे लाटले आहेत. हा सर्व प्रकार राजकीय दबावाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू."

प्रशासकीय टिप्पणीवर संशय :

तक्रार अर्जानुसार, २०१९ चा बोगस ठराव लावून ही नियुक्ती मागील दिनांकाने दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या नियुक्तीसाठी २०२६ मध्ये टिप्पणी टाकण्यात आली असून, त्यावर नेमकी स्वाक्षरी कोणाची आहे, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी प्रवीण इंगळे यांनी गटविकास अधिकारी (पंचायत समिती, पातूर) यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, याच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी (अकोला) आणि तहसीलदार (पातूर) यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता या प्रकरणाची चौकशी होऊन काय सत्य बाहेर येते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: