Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखलीत महसूल कर्मचारी संघटनेचे निवेदन; उद्याही आंदोलन सुरूच राहणार

राज्यातील सरकारी कर्मचारी-शिक्षकांच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर चिखली महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.


चिखलीत महसूल कर्मचारी संघटनेचे निवेदन उद्याही आंदोलन सुरूच राहणार

Government Employee Strike |

चिखली (Government Employee Strike) : राज्यातील सरकारी कर्मचारी-शिक्षकांच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर चिखली महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाने प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.


संघटनेने शासन-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र यांच्या प्रसिद्धीपत्रकाचा संदर्भ देत स्पष्ट केले की, दि. २१ एप्रिलपासून सुरू झालेला बेमुदत संप राज्यभर तीव्र झाला असून सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच समन्वय समितीने जाहीर केल्यानुसार उद्याही आंदोलन सुरूच राहणार असल्याचे नमूद करण्यात आले.

 

निवेदनात वेतनवाढ, भत्ते, सेवा अटी सुधारणा तसेच इतर प्रलंबित प्रश्नांचा उल्लेख करण्यात आला. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

Related to this topic: