Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जयपूर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास दिलासा; शासकीय योजनांचा लाभ तात्काळ देण्याचे निर्देश

सेनगाव तालुक्यातील मौजे जयपूर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता प्रल्हाद पायघन यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी अ‍ॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी भेट दिली.


जयपूर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास दिलासा शासकीय योजनांचा लाभ तात्काळ देण्याचे निर्देश

Government Aid Support |

सेनगाव (Government Aid Support) : सेनगाव तालुक्यातील मौजे जयपूर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता प्रल्हाद पायघन यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी अ‍ॅड. निलेश हेलोंडे पाटील (अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा) यांनी भेट दिली. या प्रसंगी प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी  तहसीलदार सखाराम मांडवगडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी ऋषीकेश होळकर, यांच्या सह पशुवैद्यकीय अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

अ‍ॅड. हेलोंडे पाटील यांनी पायघन कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ तात्काळ मिळावा यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.

या भेटीदरम्यान प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेत, प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शासकीय मदत लवकरात लवकर पोहोचविण्याची ग्वाही दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाच्या तत्परतेमुळे कुटुंबाला काहीसा आधार मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related to this topic: