Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > पुणे

पुण्यात आंदेकर गँगवॉर पुन्हा भडकला; वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची भरदिवसा हत्या

शहरातील कुख्यात आंदेकर गँगवॉरने पुन्हा एकदा रक्तरंजित वळण घेतले असून, वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीचा भाऊ अक्षय उर्फ बाळा म्हस्के याची मंगळवारी (२० मे) भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली.


पुण्यात आंदेकर गँगवॉर पुन्हा भडकला वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची भरदिवसा हत्या

Gang War |

पुणे (Gang War) : शहरातील कुख्यात आंदेकर गँगवॉरने पुन्हा एकदा रक्तरंजित वळण घेतले असून, वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीचा भाऊ अक्षय उर्फ बाळा म्हस्के याची मंगळवारी (२० मे) भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे धानकवडी परिसरातील बालाजीनगर बसस्टॉपवर ही थरारक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास काही हल्लेखोरांनी अक्षय म्हस्केवर अचानक गोळीबार केला. गोळ्या लागल्यानंतर तो खाली कोसळताच आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. चेहरा आणि शरीरावर गंभीर वार करून त्याची खात्रीशीर हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

वनराज आंदेकर हत्या प्रकरणाशी संबंध

मृत अक्षय म्हस्केचा भाऊ आकाश म्हस्के हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी असून सध्या तुरुंगात आहे. त्यामुळे ही हत्या “रिप्लाय अटॅक” असल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात रंगली आहे.

आंदेकर गँगवॉरची पार्श्वभूमी

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची काही महिन्यांपूर्वी नाना पेठ परिसरात गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली होती. कौटुंबिक वाद, वर्चस्वाची लढाई आणि टोळी संघर्षातून हा वाद चिघळल्याचे तपासात समोर आले होते.

वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर आंदेकर आणि कोमकर/म्हस्के गटांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत चार हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. तुरुंगात असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्याकडून सूड उगवण्यासाठी हल्ल्यांचे आदेश दिले जात असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेची पथके आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील हिंसाचार टाळण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

Related to this topic: