वसमत येथील बस स्टँड समोरील भागात राजश्री ऑनलाइन लॉटरी नावाचा लॉटरीचा खेळ चिठ्ठ्या देऊन चालवत असलेल्या ठिकाणी वसमत शहर पोलिसांनी छापा मारला.
वसमत (Gambling Racket) : वसमत येथील बस स्टँड समोरील भागात राजश्री ऑनलाइन लॉटरी नावाचा लॉटरीचा खेळ चिठ्ठ्या देऊन चालवत असलेल्या ठिकाणी वसमत शहर पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात सहा जणाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या छाप्याने वसमत येथील ऑन लाईन लॉटरी नावाचा जुगार चालवण्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत का याचा शोध वसमत पोलीस घेत आहेत.
वसमत येथील बस स्थानकासमोरील भागात राजश्री ऑनलाइन लॉटरी नावाचा लॉटरीचा खेळ चिठ्ठ्या देऊन चालवला जात असल्याची माहिती वसमत शहर पोलिसांना लागली पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रविवारी सायंकाळी छापा मारला व सहा जणांसह लॉटरीचे साहित्य व रोख रक्कम असा 59 हजार 388 जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नितीन रामदीनवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून धर्मपुरी नारायण गश्चेवार, संतोष बबन बोड्डेवार,शेख जुब्बेर शेख युनुस ,गंगाधर गणेश बोखारे रा. एकदरा ता. जि. नांदेड ह.मु. मंगळवारपेठ वसमत ईमरान चौधरी रा. वसमत यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई रामदिनवार, शेख नय्यर, लेकुळे, अवचार, अजय पंडित, इमरान कादरी, बाबळे आदी कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शेख नय्यर करत आहेत. अवैध व्यवसाय विरोधात धडक मोहीम सुरू असतानाही बस स्टॅन्ड समोरील भागात ऑनलाइन लॉटरी नावाचा जुगार लॉटरीचा खेळ चिठ्ठ्या देऊन चालवणारे हे आरोपी पोलिसांनी उजेडात आणले. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.