Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

नांदेडमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या 'अग्निशमन सेवा सप्ताहाची' सांगता

​नांदेडमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या 'अग्निशमन सेवा सप्ताहाची' आज उत्साहात सांगता झाली.


नांदेडमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अग्निशमन सेवा सप्ताहाची सांगता

Fire Service Week |

नांदेड (Fire Service Week) : ​"नांदेडमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या 'अग्निशमन सेवा सप्ताहाची' आज उत्साहात सांगता झाली. १४ एप्रिलपासून सुरू झालेल्या या सप्ताहाच्या निमित्ताने, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरात जनजागृती मोहिमेवर भर दिला.

आज शेवटच्या दिवशी शहराच्या विविध भागात प्रभात फेरी काढून नागरिकांना आगीपासून संरक्षणाचे धडे देण्यात आले."​"देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद अग्निशमन जवानांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.​आज या सप्ताहाच्या सांगता समारंभाप्रसंगी, अग्निशमन दलाच्या सजवलेल्या वाहनांची भव्य प्रभात फेरी शहरात काढण्यात आली.

ही फेरी शहरातील मुख्य बाजारपेठ आणि विविध रहिवासी भागांतून फिरवण्यात आली. केवळ सायरन वाजवून नव्हे, तर प्रत्यक्ष पत्रके वाटून आगीच्या घटना कशा टाळाव्यात आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, याचे मार्गदर्शन अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांनी केले"'अग्नी सेवा - सेवा परमो धर्म:' हे ब्रीद घेऊन धावणाऱ्या या जवानांच्या कार्याचे सध्या नांदेडमध्ये कौतुक होत आहे.
 

Related to this topic: