Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

भरदिवसा अचानक टेम्पोला आग; तीन जनावरांचा होरपळून मृत्यू

परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात भरदिवसा उभ्या असलेल्या टेम्पोला अचानक आग लागल्याने टेम्पोतील तीन जनावरे होरपळून मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली.


भरदिवसा अचानक टेम्पोला आग तीन जनावरांचा होरपळून मृत्यू

Fire Incident |

परभणी (Fire Incident) : परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात भरदिवसा उभ्या असलेल्या टेम्पोला अचानक आग लागल्याने टेम्पोतील तीन जनावरे होरपळून मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवार, १६ मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, खंडोबा बाजार येथे उभ्या असलेल्या टेम्पोला आग लागल्याची माहिती मनपा सदस्य गुलमीर खान यांनी अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दिपक कानोडे, रोहित गायकवाड, उमेश कदम आणि संतोष मुदीराज यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

टेम्पोमध्ये म्हशीचे तीन वघारू होते. आग लागल्यानंतर या तिन्ही जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच टेम्पोचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, मे महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून, वाढत्या तापमानामुळे वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच ताडबोरगावजवळ चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली होती.

Related to this topic: