Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

फेटरी-गोंडखैरी अपघात

फेटरी–गोंडखैरी बायपासवर भीषण अपघात

Fetary-Gondkhairi accident: कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील फेटरी-गोंडखैरी बायपास रोडवर दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात होऊन एक व्यक्तीचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले.


फेटरी–गोंडखैरी बायपासवर भीषण अपघात

Fetary-Gondkhairi accident |


दोन चारचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, चार जखमी

कळमेश्वर (Fetary-Gondkhairi accident) : कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील  फेटरी–गोंडखैरी बायपास रोडवरील खडगाव परिसरात दिनांक  ११ मे २०२६ सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, झायलो गाडी क्रमांक एमएच 14 डीएक्स 1653 व अर्टिगा गाडी क्रमांक एमएच 49 एई 2924 यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात इरफान उल्हा खान (वय 55), रा. हाऊस नं. 1202, बाबा दर्गा, बंगाली पंजा, इतवारी, नागपूर यांचा मृत्यू झाला. तर अन्य चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Fetary-Gondkhairi accident) अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Related to this topic: