Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

वहिवाटीचा रस्ता मोकळा करावा!

तालुक्यातील दापुरा शिवारातील वहिवाटीचा शेत रस्ता मोकळा करून देण्याकरिता दि. १८ मे पासून तहसील कचेरीवर मौजे दापुरा येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.


वहिवाटीचा रस्ता मोकळा करावा

Farmer Protest |

तहसील कचेरीवर उपोषणाला प्रारंभ

मानोरा (Farmer Protest) : तालुक्यातील दापुरा शिवारातील वहिवाटीचा शेत रस्ता मोकळा करून देण्याकरिता दि. १८ मे पासून तहसील कचेरीवर मौजे दापुरा येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे दापुरा शिवारातील गट क्रमांक २२/१ अ वहिवाटीच्या रस्त्यावरील लाग, काटे हटवून शेत रस्ता त्वरीत मोकळा करून देण्यासंदर्भात वारंवार निवेदनाद्वारे मागणी करूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे न्यायासाठी सोमवारपासून आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे.

या उपोषणाला माजी पंचायत समिती सदस्य मधुसूदन राठोड, शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्यासह अनेकांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी दिला असून वृत्त लिहिस्तोवर उपोषण सुरूच होते.

या उपोषणात दापुरा येथील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Related to this topic: