Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

डॉ. व्यंकटेश काब्दे यांचा राजीनामा स्वीकारू नका

नांदेड एज्युकेशन सोसायटीचा (नासो) समताधिष्ठित आणि पुरोगामी वारसा जपण्यासाठी डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाची नितांत गरज आहे.


डॉ व्यंकटेश काब्दे यांचा राजीनामा स्वीकारू नका

Education Society |

नांदेडमधील विविध संघटनांची 'नासो' सचिवांकडे मागणी

​नांदेड (Education Society) : नांदेड एज्युकेशन सोसायटीचा (नासो) समताधिष्ठित आणि पुरोगामी वारसा जपण्यासाठी डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाची नितांत गरज आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा संस्थेने स्वीकृत करू नये, अशी आग्रही मागणी नांदेडमधील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. गुरुवारी, २६ मार्च रोजी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिवांना हे विनंती निवेदन ईमेल द्वारे सादर करण्यात आले.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या संस्थेला गोविंदभाई श्रॉफ, नरहर कुरुंदकर, भाई सदाशिवराव पाटील, स. रा. गाडगीळ, डॉ. सुरेंद्र बारलिंगे, के. र. शिरवाडकर आणि दत्ता भगत यांसारख्या महनीय व्यक्तींचा समृद्ध वैचारिक वारसा लाभला आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी या परंपरेचा सन्मान राखत संस्थेच्या वैचारिक दिशेला आणि सामाजिक बांधिलकीला अधिक दृढ केले आहे.

​सध्याचा काळ हा भारतीय संविधानातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि उदारमतवादी सहिष्णुतेच्या तत्त्वांना आव्हान देणारा आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत संस्थेला डॉ. काब्दे यांच्यासारख्या विचारशील आणि बांधीलकी जपणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ संस्थेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मिळावा, ही भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

​निवेदन देणाऱ्यांमध्ये यांचा आहे समावेश:

या निवेदनावर नांदेडमधील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत, ज्यामध्ये​ एकनाथ मोरे,​विजय गाभणे,​श्याम निलंगेकर,प्रा. गौतम दुथडे,​डॉ. विठ्ठल पावडे,​फारुक अहमद,​डॉ. रेखा चव्हाण पाटील,​अॅड. अरविंद देशपांडे,​बालाजी पवार,​प्राचार्य मा. मा. जाधव,​प्रा. आदिनाथ इंगोले,​डॉ. किरण चिद्रावार,​प्रा. दिलीप चव्हाण,​बालाजी गाडे,​प्रा. बालाजी कोम्पलवार,​गंगाधर गायकवाड (जिल्हा सचिव, सिटू,​दिगंबर घायाळे,​शेख शकिला, ​प्रा. सूर्यकांत जोगदंड,​उज्ज्वला पडलवाड,​प्रा. राजेंद्र गोणारकर,​बालाजी टिमकीकर तुळशीदास शिंदे,​लता गायकवाड,​करवंदा गायकवाड ​या सर्वांनी एकमुखाने डॉ. काब्दे यांचा राजीनामा नामंजूर करून त्यांना पदावर कायम ठेवण्याची विनंती 'नासो'प्रशासनाला ईमेल द्वारे केली आहे.

Related to this topic: