परभणीतील पूर्णा तालुक्यातील गौर येथे वाळूची वाहतूक करणाऱ्या एका डम्पर ने विजेचे ८ खांब व एक रोहित्र चक्क जमीनदोस्त केल्याची घटना गुरुवार २ एप्रिल रोजी पहाटे ५:३० च्या सुमारास घडली आहे.
पहाटेची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला
परभणी (Dumper Accident) : परभणीतील पूर्णा तालुक्यातील गौर येथे वाळूची वाहतूक करणाऱ्या एका डम्पर ने विजेचे ८ खांब व एक रोहित्र चक्क जमीनदोस्त केल्याची घटना गुरुवार २ एप्रिल रोजी पहाटे ५:३० च्या सुमारास घडली आहे.
घटने बाबत सविस्तर माहिती अशी की वाळूची वाहतूक करणारा एक डम्पर पहाटे गौर येथे रेती टाकण्यासाठी आला होता. सदरील डंपरमध्ये असणारी रेती डंपरचालकाने एका बांधकामापाशी टाकून डम्पर रिकामाहीं केला.परंतु जाताना संबंधित डंपर चालकाने रेती टाकताना जो हायड्रा लावून उंच केलेली ट्राली पुन्हा जैसे थे ठिकाणी न आणता आहे त्या स्थितीतच डम्पर सुरु करून माघारी निघाला. यावेळी काही फूट अंतरावर येताच उच असणारा डम्पर चा पाठीमागिल भाग निर्धारित उंचीवर असणाऱ्या आवरण असणाऱ्या विद्युत केबल ला अडकल्या.यावेळी संबंधित डंपर चालकाने वेळीच वाहन न थांबवता तसाच पुढे नेला यात नव्याने जोडण्यात आलेल्या आवरण असणाऱ्या विद्युत केबल न तुटल्याने संपूर्ण भार रस्त्या शेजारी असणाऱ्या विद्युत खांबावर पडला व काही क्षणातच एका मागे एक असे आठ विद्युत खांब अर्ध्यातून तुटून रस्त्यावर पडले व व त्यानंतर रस्त्या शेजारी असणारा विद्युत रोहित्र देखील जमीनी वर कोसळला. एवढे होऊनही संबंधित डंपर चालक पोबारा करण्याच्या तयारीत होता. यावेळी वेगाने आपले डंपर पुढे नेण्याच्या तयारीत असतांना आसपासच्या नागरिकांनी आरडाओरडा करून संबंधित डंपर थांबवला व त्यानंतर अडकलेली वायर काढून रस्ता सुरळीत करण्यात आला.
पूर्णेतील गौर येथील घटना
पहाटेची वेळ असल्याने रस्त्यात शुकशुकाट असल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून चालकांने प्रसंगावधान राखत वेळीच वाहन थांबवले असते तर संबंधित घटना टळली असती .असं गावकरी बोलून दाखवत आहेत.आता संबंधित डंपर मालकाकडून नुकसान भरपाई पोटी विद्युत खांबाची दुरुस्ती करण्यास सुरूवात झाली असून रोहित्र उभारण्याचे काम देखील सुरू आहे.महावितरणअधिकारी कर्मचारी यांच्या देखरेखी खाली वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे.