Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

बँक मॅनेजरची बेदरकार ड्रायव्हिंग! नागपुरात निष्पाप दाम्पत्याचा जागीच अंत...

शहरातील बेसा परिसरात घडलेल्या भीषण अपघातात एका निष्पाप दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


 बँक मॅनेजरची बेदरकार ड्रायव्हिंग नागपुरात निष्पाप दाम्पत्याचा जागीच अंत

Drunk Driving |

नागपूर (Drunk Driving) : शहरातील बेसा परिसरात घडलेल्या भीषण अपघातात एका निष्पाप दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवणाऱ्या बँक व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. विजय भगवान सावरकर (वय ५३) आणि त्यांची पत्नी सुरेखा विजय सावरकर (वय ४८, रा. हरीहरनगर, बेलतरोडी) यांचा यात दुर्दैवी अंत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सावरकर दाम्पत्य त्यांच्या जावयाच्या नितीन सुरेश कळंबे (वय ३०)  मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी दिघोरीतील आराधनानगर येथे गेले होते. बुधवारी नितीन यांच्या मुलीचा वाढदिवस सोहळा आराधनानगर येथील आहान सेलिब्रेशन हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्रीच्या १२ वाजता च्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. याचवेळी बेसा चौक ते पुरुषोत्तम बाजार चौकदरम्यान समोरून येणारी कार अचानक त्यांच्या वाहनावर धडकली.

ही कार पंकज डेकाटे (४७, रा. न्यू नरसाळा, हुडकेश्वर) चालवत होता. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताच्या क्षणी त्याचे लक्ष मोबाईलकडे गेले आणि वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि सावरकर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपी डेकाटे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

 

Related to this topic: