Dr. Babasaheb Ambedkar: नांदेडमध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित
Dr. Babasaheb Ambedkar |
नांदेड (Dr. Babasaheb Ambedkar) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्या वतिने श्री शिवानंद मिनगीर, सहाय्यक आयुक्त्, समाज कल्याण नांदेड व कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी यांनी सर्व प्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळया पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
तद्नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) सामाजिक न्याय भवानातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यायातील,सांस्कृतिक सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त मुख्य कार्यक्रम व व्याख्यानाचे आयोजन करण्यता आले होते सदर कार्यक्रामाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, राहूल कर्डीले (भा.प्र.से’) नांदेड हे होते. तर प्रमुख पाहुने छाया कुलाल, उपायुक्त, जिल्हा जाती पडताळणी कार्याल नांदेड व शिवांनद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री गजानन नरवाडे, समाज कल्याण अधिकारी,अशोक गोडबोड, सेवानिवृत्त वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक , भगवान ढगे, समाज भुषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती तसेच माधव आंबटवाड दलित मित्र पुरस्कार व्यक्ती , संतोष चव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी होते तर प्रमुख्य व्याख्याते म्हणून प्रा.डॉ.अजय गव्हाणे यशवंत महाविद्यालय नांदेड व प्रा.संदिप गोणारकर, प्राचार्य सिध्दार्थ महाविद्यालय नांदेड हे उपस्थिती होते.

जिल्हाधिकारी नांदेड राहूल कर्डीले (भा.प्र.से’) जिल्हाधिकारी नांदेड व शिवानंद मिनगीरे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अपर्ण करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर जिल्हाधिकारी राहूल कर्डीले व श शिवानंद मिनगीरे व इतर मान्यवरांच्या उपस्थित भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) सामजिक समता सप्ताहाचे अवचित्य साधून नागरी हक्क संरक्षण अंतर्गत अत्याचार पिडीत दिवंगत व्यक्तीच्या कुंटूबातील पात्र 13 वारसदारास शासकीय नोकरीचे आदेश व कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 पात्र लाभार्थ्यांना जमीनच्या आदेशाचे वाटप जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या हस्ते तसेच छाया कुलाला उपायुक्त, जिल्हा जात पडताळणी नांदेड व शिवानंद मिनगीरे सहाय्यक आयुक्त, यांच्या हास्ते आदेश देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्तावीक शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी केले सदर प्रस्तावीकेत सामाजिक समता सप्ताह 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 मध्ये समाजिक न्याय विभागा अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रम माहिती देवून उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या .
राहूल कर्डीले (भा.प्र.से’) जिल्हाधिकारी नांदेड यांनी अध्यक्षीय भाषण करुन उपस्थितांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन कार्यावर प्रकाश टाकून प्रज्ञा शिल करुना यांचे वास्तवीक जिवनात आचरण करावे असे प्रेरणादायी मत व्यक्त करुन मार्गदर्शन केले. त्यांनतर मंचावरील इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर दादासाहेब सबळीकरण स्वाभिमान सबळीकरण शेतकरी मेळावा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी शेतकऱ्यासाठी केलेली माहिती याबाबत सखोल मार्गदर्शन करणारे व्याख्यान प्राध्यापक डॉ. अजय गव्हाने यशवंत महाविद्यालय नांदेड यांनी केले. तसेच महाड येथील चवदार तळे सत्याग्रह बध्दल माहिती व त्यांनूसार मानवी हक्काचे महत्व सांगणारे व्याख्यान प्रा. संदिप गोणारकर प्राचार्य सिध्दार्थ महाविद्यालय नांदेड यांनी केले.
समाज कल्याण विभागा मार्फत आयोजित सामाजिक सप्ताह अंतर्गत भारतीय संविधानाच्या प्रास्तावीकेचे नियमीत सामुहिक वाचन करण्यात आले. तसेच सहाय्यक आयुक्त्, समाज कल्याण नांदेड कार्यालया अधिनस्त शासकीय वसतिगृह व शासकिय निवासी शाळा येथे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या विचारांवर आधारीत वक्तृत्व स्पर्धा , निबंध स्पर्धा , लघुनाटय , पथनाटय चित्रकला तसेच वाचन-प्रेरणा महात्मा ज्योतिबा फुले यांनी जयंती व त्यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकणारे व्याख्याव तथा महिलाचा जागार मेळावा, ज्येष्ठ नागरीकांसाठी आरोग्य शिबीर संत गाडगे बाबत स्वच्छता अभियान व घरघर संविधान अशी अनेक उपक्रम घेवून इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समातादूता मार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाटयाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. सदरील कार्यक्रमात सामाजिक समता सप्ताहाची सांगता करण्यात आली.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी /कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले .सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन पांपटवार यांनी केले तर अभार प्रदर्शन गजानन नरवाडे समाज कल्याण अधिकरी नांदेड यांनी केले.सदर कार्यक्रमास कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध महामंडळाचे अधिकारी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.