Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

पेट्रोल पंपावर डिझेल वितरणात दुजाभाव

शेंदुरजना आढाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल वितरण करताना काही वाहनधारकांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.


पेट्रोल पंपावर डिझेल वितरणात दुजाभाव

Diesel Shortage |

शेंदुरजना आढाव येथील प्रकारावर शेतकऱ्यांचा आरोप; चौकशीची मागणी

मानोरा : तालुक्यातील शेंदुरजना आढाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल वितरण करताना काही वाहनधारकांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. डिझेलसाठी लांबून आलेल्या अनेक शेतकऱ्यांना “डिझेल संपले” असे सांगून परत पाठविण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात डिझेल टंचाई निर्माण झाल्यामुळे पेट्रोल पंपांवर शुकशुकाट दिसून येत आहे. काही पंपांवर डिझेल आले की काही तासांतच संपत असून ‘नो स्टॉक’चा फलक लागतो. अशा परिस्थितीत बुधवारी शेंदुरजना आढाव येथील पंपावर डिझेल उपलब्ध झाले असता वितरणात दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही शेतकऱ्यांना परत पाठवल्यानंतर थांबलेल्या काही वाहनचालकांना मात्र डिझेल देण्यात आले. याबाबत प्रहारचे चेतन पवार यांनी आरोप करताना पंपावर काळाबाजार सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सध्या शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असल्याने डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना डिझेलसाठी ताटकळत राहावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने तात्काळ चौकशी करून डिझेल वितरण पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Related to this topic: