Breaking News
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का
  • हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत बेपत्ता झालेल्या बालकाचा संशयास्पद मृत्यू
  • लग्नसोहळ्यात थरार! पुतण्याच्या हल्ल्यात काका-चुलत भावाचा खून
  • इराणची विनाशकारी योजना; गूगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉनची कार्यालये उडवण्याची धमकी
  • IAS तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल '24 वेळा' बदली
  • नासाची आर्टेमिस-2 मोहीम; 54 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्र मोहिमेकडे
  • 'कूपर कॉनोली' ठरला पंजाब किंग्सच्या विजयाचा हिरो

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

धानापूरजवळ दुर्दैवी अपघात

आष्टी–चंद्रपूर मार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, सहा वर्षांची चिमुकली बचावली

धानापूर येथील जिनिंगजवळ मालवाहू ट्रकाने दुचाकीला धडक देऊन पती-पत्नीचा मृत्यू झाला. त्यांची ६ वर्षांची मुलगी सिया थोडक्यात बचावली.


आष्टी–चंद्रपूर मार्गावर भीषण अपघात पती-पत्नी ठार सहा वर्षांची चिमुकली बचावली

धानापूरजवळ मालवाहू ट्रकची दुचाकीला धडक

चामोर्शी (गडचिरोली) 
आष्टी–चंद्रपूर मार्गावर धानापूर येथील जिनिंगजवळ दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्या सहा वर्षांच्या चिमुकलीचा थोडक्यात जीव वाचल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतांमध्ये गौतम सुरेश निमसरकर (वय ३६) व वैशाली गौतम निमसरकर (वय ३०, रा. अनखोडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) यांचा समावेश आहे. तर त्यांची मुलगी सिया (वय ६) ही या अपघातातून बचावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निमसरकर दांपत्य आपल्या दुचाकीने मुलीसह कामानिमित्त चंद्रपूर येथे गेले होते. काम आटोपून परत येत असताना धानापूर येथील जिनिंगजवळ मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गौतम यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या वैशाली यांना गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

अपघातावेळी सिया ही दुचाकीवरून दूर फेकली गेली. मात्र नशिबाने ती गंभीर जखमी होण्यापासून बचावली. आपल्या डोळ्यांसमोर आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने तिने एकच आक्रोश केला, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.

गौतम निमसरकर हे अनखोडा ग्रामपंचायतीत संगणक परिचालक म्हणून कार्यरत होते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांची गावात चांगली ओळख होती. या दुर्दैवी घटनेमुळे अनखोडा गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: