Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर

पुण्यात संतापजनक प्रकार; नसरापूर-पर्वती प्रकरणाने राज्य हादरले, ९ वर्षीय नातीवर अत्याचाराचा प्रयत्न

पुणे शहरातील पर्वती पायथा परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.


पुण्यात संतापजनक प्रकार नसरापूर-पर्वती प्रकरणाने राज्य हादरले ९ वर्षीय नातीवर अत्याचाराचा प्रयत्न

Crime Against Children |

पुणे (Crime Against Children) : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळलेली असतानाच, पुणे शहरातील पर्वती पायथा परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७० वर्षीय आजोबाने आपल्या वर्षीय नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पीडितेचे आई-वडील मजुरीसाठी घराबाहेर गेले होते. याच वेळी आरोपी अंबादास यल्लाप्पा जाधव याने नातीला घरात एकटे गाठले. त्याने घरातील नातवाला खाऊचे आमिष दाखवून पैसे देत बाहेर पाठवले आणि दरवाजा आतून बंद करून नातीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शेजारी राहणाऱ्या एका महिलेचे लक्ष पत्र्याच्या फटीतून घरात गेले. तिने संशय आल्याने आरडाओरडा केला. आवाज ऐकताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. संतप्त जमावाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती गंभीर होताच आरोपीने घाबरून चिमुरडीला पोटमाळ्यावर लपवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून बाहेर आणले आणि त्याला मारहाण केली. “अशा नराधमाला कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी करत मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. पर्वती पायथ्यापासून ते नवी पेठेपर्यंत परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

पीडितेच्या आईनेही संताप व्यक्त करत, “तो माझा सासरा असला तरी त्याला फाशीची शिक्षा द्या,” अशी मागणी केली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी आश्रयासाठी घरी आलेल्या सासऱ्यानेच असे कृत्य केल्याने कुटुंब हादरले आहे.

सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. पर्वती परिसरात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

Related to this topic: