Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

बोरखेडी येथिल स्मशानभुमी उपोषणाला दुस-यांदा प्रारंभ..!

बोरखेडी गावातील प्रलंबित स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा पेटला


बोरखेडी येथिल स्मशानभुमी उपोषणाला दुस-यांदा प्रारंभ

Cremation Ground Demand |

प्रशासणाचे आश्वासन विरले हवेत

रिसोड (Cremation Ground Demand) : रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील कडुजी रामभाऊ आघाव या युवकाने गावहितासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मागील महिन्यात 7 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत त्यांनी गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या निर्मितीसाठी उपोषण केले होते. मात्र, बीडीओ यांच्या मध्यस्थीने दिलेल्या आश्वासनानंतर ते उपोषण पुढे ढकलण्यात आले होते.

मात्र, प्रशासनाने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे. बोरखेडी गावाला प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत कडुजी आघाव यांनी 11 मे पासून ग्रामपंचायत समोर पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.

गावात स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांना रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची वेदनादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. हा प्रकार आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

10 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या उपोषणाला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळाल्याने प्रशासनाचे लक्ष वेधले गेले होते. त्यावेळी रिसोड पंचायत समितीचे बीडीओ आणि विस्तार अधिकारी यांनी भेट देऊन काही दिवसांत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते.

दरम्यान, स्थानिक ग्रामपंचायत सचिवांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला असला तरी पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि भूमी अभिलेख विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे दिलेले आश्वासन हवेत विरल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओबीसी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष दीपक किशनराव बुधवंत यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. स्मशानभूमी ही गावासाठी अत्यावश्यक सुविधा असून त्यासाठी उपोषण करावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या या उपोषणात संपूर्ण ग्रामस्थांचा सहभाग वाढत असून प्रशासनाने तातडीने स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

Related to this topic: