Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे तात्काळ पूर्ण करा: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta: जलजीवन मिशन अंतर्गत विविध नळ पाणी पुरवठा योजनेची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून संबंधित गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्द


जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta |

हिंगोली (Collector Rahul Gupta) : जलजीवन मिशन अंतर्गत विविध नळ पाणी पुरवठा योजनेची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून संबंधित गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर प्रगती आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, जलजीवन मिशनचे अभियंते तसेच संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत विविध नळ पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, तांत्रिक अडचणी तसेच योजनांच्या कार्यान्वयनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यात असलेल्या योजनांना गती देऊन नागरिकांना लवकरात लवकर शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

तसेच, नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत जोडण्यांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या योजनांसाठी महावितरणकडून विद्युत जोडणी प्रलंबित आहे, त्या प्रकरणांमध्ये तातडीने आवश्यक कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल दि. 20 मे 2026 पर्यंत सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी जलजीवन मिशन अंतर्गत त्रयस्थ तांत्रिक तपासणी करण्यात आलेल्या योजनांचाही आढावा घेतला. तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या सर्व त्रुटी व मुद्द्यांची पूर्तता आठ दिवसांच्या आत करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

Related to this topic: