Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला गती द्या: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta


जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला गती द्या जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta |

हिंगोली (Collector Rahul Gupta) : जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, साठवण तलाव, उच्च पातळी बंधारे, लिगो प्रकल्प तसेच अन्य विकास कामांच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीमती मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, सर्व उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रशांत बिलोलीकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या भूसंपादन प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये जलसंपदा प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, उच्च पातळी बंधारे, साठवण तलाव आदी प्रकल्पांतील प्रलंबित मावेजा वाटप, भूसंपादन मोजणी, लिगो प्रकल्पासंदर्भातील भूसंपादन प्रक्रिया तसेच इतर अनुषंगिक बाबींची चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी वाटाघाटीद्वारे समितीसमोर ठेवावयाची प्रकरणे, दर निश्चिती, निवाडा पारित झालेल्या प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके, ताबा घेतलेल्या जमिनींच्या मावेजा वाटपाची स्थिती तसेच प्राधिकरणाकडे पाठवावयाच्या प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेतला. भूसंपादन प्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरळीत व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया गतीमान करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related to this topic: