Breaking News
  • "जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही!" – तुपकरांचा सरकारला इशारा
  • अल निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाई होण्याची शक्यता
  • बारामती शहरात आता एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार
  • नाशिकमध्ये वाद मिटवण्याच्या बहाण्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
  • नाशिक-मुंबई महामार्गावरील आर.सी. पाटील पुलावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील मागे बसलेल्या महिलेचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.
  • परभणीत दाखल होताचा खासदार संजय जाधव यांना मिळणार Y+ सुरक्षा
  • बीडमध्ये FDA ची मोठी कारवाई; 6.68 लाखांचा मुद्देमाल जप्त
  • पुणे- ग्रामीण जबरी चोरी, चेन स्नॅचिंग व घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
  • छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत ५२.२८ टक्के मतदान

होम > आपले शहर > पुणे

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न; युवकाची सुखरूप सुटका

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडल्याने काही काळ गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.


पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न युवकाची सुखरूप सुटका

Collector Office Incident |

पुणे (Collector Office Incident) : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडल्याने काही काळ गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ एका युवकाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिस व अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आणि युवकाची सुखरूप सुटका करण्यात आली.

या प्रकरणातील युवकाचे नाव राम पाचकाळ असे असून तो राजगड तालुक्यातील आहे. राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या अतिक्रमणाचे चित्रीकरण करत असताना काही व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप त्याने केला आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी तो जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता.

दरम्यान, आपल्या मागणीवर तातडीने कारवाई होत नसल्याची भावना झाल्याने पाचकाळ यांनी अचानक टोकाचे पाऊल उचलत इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील जाळीवर चढ घेतली. हा प्रकार लक्षात येताच कार्यालयात एकच खळबळ उडाली. तत्काळ पोलिसांनी परिसर सुरक्षित करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत युवकाला खाली उतरवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सविस्तर चौकशी सुरू असून त्याने केलेल्या आरोपांचीही तपासणी केली जात आहे.

या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related to this topic: