Drug Sellers Mukmorcha: बेकायदेशीर ऑनलाइन औषध खरेदी-विक्रीसंदर्भातील केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात अखिल भारतीय केमिस्ट संघटनेच्या वतीने बुधवार २० मे रोजी देशव्यापी एकदिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले होत
अखिल भारतीय केमिस्ट संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद; जिल्हाधिकार्यांना निवेदन
परभणी (Drug Sellers Mukmorcha) : बेकायदेशीर ऑनलाइन औषध खरेदी-विक्रीसंदर्भातील केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात अखिल भारतीय केमिस्ट संघटनेच्या वतीने बुधवार २० मे रोजी देशव्यापी एकदिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंदला जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवून मुकमोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे १८०० औषध दुकाने बंद ठेवून जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या (Drug Sellers Mukmorcha) आंदोलनाच्या माध्यमातून ऑनलाइन औषध विक्रीमुळे छोट्या औषध विक्रेत्यांवर होत असलेल्या परिणामाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. तसेच जनतेच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित करत बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेटस् अव्यवसायिक डिस्काउंट बंद करा, बनावट औषधीपासून देश वाचवा अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना देण्यात आले.
याप्रसंगी (Drug Sellers Mukmorcha) ऑल इंडिया, ऑर्गनाझेशन ऑफ केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट, महाराष्ट राज्य केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सचिव राजीव सिंघल, अनिल नावंदर, जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव सूर्यकांत हाके, कोषाध्यक्ष पवन जंजारी, उपाध्यक्ष घाडगे, सहसचिव मुंदडा, धीरज सोमानी यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व औषध विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.