बजरंग दलाच्या कार्यकर्त्यास मारहाण
पांढरकवडा (Cattle Smuggling) : २९ रोजी पहाटे ४ वाजता दरम्यान पोलीसांनी पांढरकवडा येथील टोल टॅक्स जवळ जनावरे भरुन असलेले एक आयचर वाहन पकडुन त्यातील २७ जणावरांची सुटका केली आहे. याच कार्यवाही दरम्यान जनावरांच्या वाहनांची पायलटिंग करणार्या काहींनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यास जनावरांचे वाहन अडविल्या प्रकरणी मारहाण केली आहे. या कार्यवाहीमध्ये पोलीसांनी २९ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. राष्ट्रीय महामार्गाने मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी सुरु आहे. पोलीसांच्या वतीने अधुन,मधुन जणावरांच्या वाहनांवर कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र जनावरांच्या वाहनांची पायलटिंग करणारे दैंनदिन जनावर भरुन असलेले अनेक वाहने पायलटिंग करुन तेलंगणात पास करीत आहे.
२९ रोजी नागपुर-वडकी-पांढरकवडा मार्गे जनावरांची तस्करी तेलंगणात सुरु असल्याची माहिती येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यांनी याची माहिती पोलीसांना सुध्दा दिली. त्यांनी सर्वप्रथम पांढरकवडा येथील टोल टॅक्सवर जनावर भरुन असलेले एक वाहन अडविले होते. मात्र जनावरांच्या वाहनांची पायलटिंग करीत असलेल्या अमिर उर्फ भुर्या मुनिर मलनस रा मोमीनाबाद कॉलनी पांढरकवडा व ईतर दोन ते तिन इसमांनी एका बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घालुन तो ट्रक पळवुन नेला. त्या पकडलेल्या ट्रकासोबत ईतर पाच ते सहा ट्रक सुध्दा त्यांनी त्यावेळी पोलीस येईपर्यत पास केल्याचे बोलल्या जात आहे. काही वेळाने घटनास्थळी ठाणेदार एल डी तावरे व पोलीस पथक दाखल झाले.
पोलीस पथक बघताच नागपुरकडुन आलेल्या एम एच ४० सिटी १३१८ या आयचर वाहन चालकाने गाडी सोडुन अंधाराचा फायदा घेवुन तेथुन पळ काढला. पोलीसांनी आयचर वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये २७ जणावरांना दोरखंडाने अमानुषपणे बांधुन असल्याचे आढळुन आले. पोलीसांनी ते सर्व जनावरे ताब्यात घेवुन त्यांची पांढरकवडा नगर परिषदेच्या कोंडवाड्यामध्ये रवानगी केली आहे. पोलीसांनी या कार्यवाहीमध्ये ९ लाख ४५ हजार रुपये किमतीचे जनावरे व २० लाख रुपये किमतीचा आयचर असा एकुण २९ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करुन अज्ञात आरोपी विरुध्द विविध कलामन्वये गुन्हे दाखल केले आहे.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांने दिली मारहाणीची तक्रार
पांढरकवडा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी टोल टॅक्स जवळ एम एच ३१ डीएस ७७८६ या क्रमांकाचे जनावर भरुन असलेले वाहन पकडले होते. ते वाहन का पकडले म्हणुन भुर्या मनलस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये हुज्जत झाली होती. यावेळी भुर्यासोबत असलेल्या दोन ते तिन अज्ञातांनी जनावरांची ईतर पाच ते सहा वाहने पास केली. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते टोल टॅक्सजवळ गेले असता, त्यांच्या मागुन पांढर्या रंगाच्या स्विप्ट कारमध्ये आलेल्या अमिर उर्फ भुर्या मलनस व त्याच्या दोन ते तिन अज्ञात सहकार्यानी विवेक शंकर अक्केवार ३१ रा पांढरकवडा याची जनावरांचे वाहन अडविल्याच्या कारणावरुन कॉलर पकडुन मारहाण केली. त्याला व त्याच्या ईतर सहकार्र्यांना धमकावुन जिवे मारण्याची व अंगावर वाहन चढविण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद आहे.