Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

गुप्तधनासाठी स्मशानभूमीत अघोरी पूजा ! कुमारी मुलीसह विधवा महिलांचा पूजेसाठी वापर


गुप्तधनासाठी स्मशानभूमीत अघोरी पूजा  कुमारी मुलीसह विधवा महिलांचा पूजेसाठी वापर 

Black Magic Case |

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील घटनेने सर्वत्र खळबळ; आरोपिचे परराज्यात कनेक्शन असल्याचे संकेत 

चंद्रपूर (Black Magic Case) : राज्यात भोंदू अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात जादूटोण्या द्वारे गुप्तधन शोधण्यासाठी चक्क स्मशानभूमीत कुमारी मुली व विधवा महिलांचा वापर पूजाअर्चा करण्यासाठी करण्यात येत असल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत नियत क्षेत्र सिरसी मधील चिचडोह बॅरेज जवळ दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून जिवंत कासव व घुबड पकडण्यात आल्यानंतर अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशी तून हा धक्कादायक प्रकार उजेडात आला.

​​​​​​​

कासव शिकार प्रकरणी वन कोठडीतील असलेल्या 6 आरोपीपैकी 3 आरोपींना दिनांक 20 एप्रिल पर्यंत 5 दिवसाची वन कोठडी तर उर्वरित 3 आरोपींना 30 एप्रिल पर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी सुनावण्यात आली आहे. आरोपीमध्ये गंगाधर पांडू बुरांडे (49) , मोरेश्वर देविदास देवतळे ( 38),ओम देव गिताबाई शिंदे (25), हेमचंद उमाजी शेंडे (28 ), धवल उष्टू वेलादी (30), राजेंद्र शामराव दिवसे (52) यांचा समावेश आहे. हे आरोपी जाम खुर्द तालुका पोंभुरणा, जिल्हा चंद्रपूर ,  गणपुर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली व चक नवेगाव, पोस्ट नवेगाव मोरे, तालुका पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर येथील राहणारे असल्याची माहिती आहे.

वरील सहाही आरोपीविरुद्ध वन गुन्हा क्रमांक 204/232855/2026 दिनांक 12.04.2026 वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,49, 50 व 51 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. चौकशी दरम्यान वरील सहाही आरोपींचे मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता, वन्य प्राणी कासव व घुबड यांच्या व्यापारातील अनेक पुरावे पुढे आले. व्यापारातील इतर लोकांशी साधलेला संवाद, मोबाईल वरील चॅटिंग, अवैधरित्या बाळगलेल्या वन्य प्राण्यांचे फोटो व व्हिडिओ तसेच ईतर पुरावे तपासणीत आढळले.

सदर प्रकरणी आरोपींची कसून चौकशी केली असता, आरोपींचे मोबाईल मध्ये अवैधरित्या पकडून ठेवलेले बाळगलेल्या कासव व घुबड या वन्य प्राण्यांचे फोटो व्हिडिओ आणि त्यांसोबत पूजाअर्चा करताना जादू करताना चे व्हिडिओ तसेच फोटो आढळले. त्याचबरोबर त्यांच्या मोबाईल मध्ये अनेक तरुण मुलींचे व विधवा स्त्रीचे व्हिडिओ फोटो वेगवेगळ्या अवयवाचे फोटो आणि त्यांची संपूर्ण जन्म कुंडली याबाबतची माहिती तपासात समोर आली. सदर चे व्यवहारामध्ये अनेक महिलांचा सुद्धा समावेश आढळून आला. त्या महिला चिमूर, पोंभुर्णा, मुल, गोंडपिपरी व चामोर्शी या तहसील मधील असल्याचे निदर्शनास आले.

आरोपींचे मोबाईल मधील डेटा रिकव्हर केला असता, स्मशान भूमी मध्ये पूजा अर्चा करताना, मुलांचे मुलींचे फोटो, मुलींचे नाव जन्मतारीख रास तसेच पाळीचा दिनांक यासह अनेक महिलांची जन्मकुंडली आढळली. दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी वरील सहाही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसाची दिनांक 16 एप्रिल पर्यंत वन कोठडी सुनावली. दिनांक 14 एप्रिल रोजी अनेक आरोपींकडे काळया जादूद्वारे सोन्याचे बिस्कीट असल्याची माहिती समोर आली परंतु ते ताब्यात घेण्यासाठी वनविभागाची चमू पोहोचली आणि मुद्देमाल ताब्यात घेतला असता ते डुप्लिकेट बिस्कीट असल्याचे निदर्शनास आले. अनेकांच्या मोबाईल मध्ये कासव व घुबड या वन्यप्राण्यांचे वजन करताना व पूजा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ मिळाले.  या अवैध व्यवसायात अनेक मध्यस्थी जे प्रत्यक्ष जादूगर किंवा महाराज यांच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले असून वनविभागाची चमू मुख्य जादूगार पर्यंत पोहोचून ही साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे.

दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी वनकोठडीतील सहाही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 3 आरोपींना 5 दिवसाची दिनांक 20 एप्रिल 2026 पर्यंत वनकोठडी तर उर्वरित तीन आरोपींना 30 एप्रिल 2026 पर्यंत पंधरा दिवसाची मॅजिस्ट्रेट कोठडी सुनावली. दिनांक 14 व 15 एप्रिल चे चौकशी दरम्यान तपासात पुढे आलेले एकूण 16 आरोपींना सुद्धा चौकशी करिता नोटीस बजावली असून यात अनेक मोठे मासे सुद्धा गळाला लागण्याची शक्यता आहे.

सदर प्रकरण रामानुजम मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली,  राजन तलमले यांच्या नेतृत्वाखाली विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर व विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली व संपूर्ण वनकर्मचारी पुढील तपास हे करीत आहेत .

Related to this topic: