Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

होंडा युनिकॉर्न दुचाकी चोरीला; चान्नी येथील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल

चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक होंडा युनिकॉर्न कंपनीची दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.


होंडा युनिकॉर्न दुचाकी चोरीला चान्नी येथील घटना पोलिसांत गुन्हा दाखल

Bike Theft Case |

चान्नी (Bike Theft Case) : चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक होंडा युनिकॉर्न कंपनीची दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत तायडे (रा. चान्नी) यांच्या मालकीची होंडा युनिकॉर्न (क्र. MH 30 BV 4374) ही दुचाकी दिनांक १६ मे २०२६ च्या मध्यरात्री ते १७ मे २०२६ च्या पहाटे ६:०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. सदर दुचाकी माजी सरपंच चंद्रकांत तायडे यांची असून या घटनेबाबत चान्नी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा क्रमांक ०२१५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मदत करण्याचे आवाहन!

सदर वर्णनाची आणि क्रमांकाची दुचाकी कोणालाही संशयास्पद स्थितीत आढळून आल्यास किंवा याविषयी काहीही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे — चंद्रकांत तायडे ९७६७९४६०५३.

Related to this topic: