Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची पांगरा शिंदे गावाला भेट

Collector Rahul Gupta: भूकंपानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पांगरा शिंदे गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांशी संवाद साधला


भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची पांगरा शिंदे गावाला भेट

Collector Rahul Gupta |

हिंगोली (Collector Rahul Gupta) : जिल्ह्यातील पांगरा शिंदे येथे भूकंप मापन केंद्रांच्या नोंदीनुसार ४.७ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज रविवारी (दि.१२) पांगरा शिंदे  येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत भूकंपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली. काही ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती नागरिकांनी दिली असून प्रशासनाकडून आवश्यक ती पाहणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिक सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत असल्याचेही (Collector Rahul Gupta) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Related to this topic: