Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

मतदार संघाच्या विकासासाठी कटिबद्ध - आ. सईताई डहाके

मानोरा विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आणि धर्मगुरु आ. बाबुसिंग महाराज कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. सईताई प्रकाश डहाके यांनी आसोला खुर्द येथे आयोजीत कार्यक्रमात दिली.


मतदार संघाच्या विकासासाठी कटिबद्ध - आ सईताई डहाके 

Bhoomipujan Ceremony |

१ कोटी ४५ लक्ष रुपयांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात! 

कारंजा (Bhoomipujan Ceremony) : मानोरा विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आणि धर्मगुरु आ. बाबुसिंग महाराज कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. सईताई प्रकाश डहाके यांनी आसोला खुर्द येथे आयोजीत कार्यक्रमात दिली. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व विकास प्रेमी बांधवांच्या उपस्थितीत तालुक्यातील चार गावात १ कोटी ४५ लक्ष रुपयाच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा दि. १८ एप्रिल रोजी शनिवारला उत्साहात पार पडला.

यावेळी हिवरा येथे रस्ता ३५ की. मी. दर्जोन्नती, मजबुतीकरण व आर सी डब्ल्यू किंमत ४० लक्ष, आसोला खुर्द ते गव्हा रस्ता सुधारणा करणे ५५ लक्ष, अमाकिन्ही येथे ४१ की .मी. रस्ता पूलासह सुधारणा करणे ४० लक्ष व आमकिन्ही येथे सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे असे एकूण १ कोटी ४५ लक्ष रुपयांचा भूमिपूजन सोहळा आ. सईताई डहाके व आ. बाबुसिंग महाराज यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पुढे बोलताना आ. डहाके म्हणाल्या की, बारस निमित्त परमहंस श्री सोहमनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी यात्रेकरीता लाखो भाविकांना जाण्या येण्यासाठी एका रस्त्यावर वाहनाची वर्दळ जाणवत होती, त्यावेळी समस्त गावकरी मंडळीची निवडणूक काळात भेट घेऊन आसोला खुर्द ते गव्हा रस्ता सुधारणा करून देण्याचे आश्वासन दिले होते. आज त्या आश्वासनाची रस्ता काम मार्गी लाऊन परतफेड करून देत दिलेला शब्द पूर्णत्वास नेल्याचे आनंद होत आहे. यापुढेही लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी दत्तराज डहाके, भक्तराज महाराज राठोड आदीसह इतरांनी आपले विचार व्यक्त केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मगुरु विधान परिषदेचे आ. बाबुसिंग महाराज होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके होते तर प्रमुख उपस्थितीत प्रदेश सहसंयोजक भक्तराज राठोड महाराज, मानोरा मंडळाचे भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद इंगोले, पोहरादेवी मंडळाचे भाजपा तालुकाध्यक्ष गणेश जाधव, कौस्तुभ डहाके, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष महादेवराव ठाकरे, वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश लोथे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मित्तल धोटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ अरविंद यावलकर, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष मनोज खडसे, सरचिटणीस तथा सहसंयोजक प्रवीण धोटे, दिलीप चव्हाण, प्रा. हेमंत देशमुख, माजी गटनेता गोपाल भोयर, सामाजिक कार्यकर्ता वसंतराव राठोड, सरपंच्या सौ निकिता राठोड, सदस्या सौ रजनी हांडे, उपसरपंच बादल राठोड, शामराव नाईक, मोहन नाईक, माजी प्राचार्य संजय हांडे, मिलिंद देशमुख, माजी सरपंच भिमराव राठोड,  वाईगोळ ग्राम पंचायतचे माजी सरपंच जयसिंग भासू राठोड, भाजपा पोहरादेवी मंडळ सदस्य पंडीत जाधव, पोहरादेवीचे शासकीय ठेकेदार भिकासिंग चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता पुंडलिक राठोड, रतीराम राठोड, निखिल अंभोरे, दिनेश राठोड, संतोष ढवळे, महिंद्रा राठोड, अर्जुन साबळे, राम राठोड, मनोज चव्हाण, नरेश खत्री, अन्सार मितया, सुनील देशमुख कोंडोलीकर, यांसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी मंडळी व विकास प्रेमी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: