Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

दि चिखली अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. आशुतोष गुप्ता; उपाध्यक्षपदी मनीष गुरुदासानी यांची बिनविरोध निवड

आज, १६ एप्रिल रोजी झालेल्या बँकेच्या पहिल्या सभेत अध्यक्षपदी डॉ. आशुतोष सतीश गुप्ता तर उपाध्यक्षपदी मनीष गुरुदासानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


दि चिखली अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी डॉ आशुतोष गुप्ता उपाध्यक्षपदी मनीष गुरुदासानी यांची बिनविरोध निवड

Bank Election |

चिखली (Bank Election) : विदर्भातील सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या 'दि चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. चिखली'च्या संचालक मंडळाची सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालखंडासाठीची निवडणूक प्रक्रिया अखेर उत्साहात पार पडली. आज, १६ एप्रिल रोजी झालेल्या बँकेच्या पहिल्या सभेत अध्यक्षपदी डॉ. आशुतोष सतीश गुप्ता तर उपाध्यक्षपदी मनीष गुरुदासानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सहकार नेते सतीश गुप्ता यांनी या संपूर्ण प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी या निवडणुकीचा अधिकृत निकाल प्रसिद्ध करून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संपूर्ण संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

नूतन संचालक मंडळ खालीलप्रमाणे : 

बँकेच्या या नवीन कार्यकारिणीत अनुभवी आणि अभ्यासू चेहऱ्यांचा समावेश झाला आहे:
अध्यक्ष : डॉ. आशुतोष सतीश गुप्ता
उपाध्यक्ष : मनीष गुरुदासानी

संचालक म्हणून सतीश भगवानदास गुप्त, अभिजित नारायणसिंह राजपूत, श्यामसुंदर चंपालाल पारीख, नरेंद्र रमेशचंद्र लढ्ढा, अमोल अशोकराव खेकाळे, पुसाराम आसाराम मुंदडा, अमित पुखराज जैन (बेगाणी), पियुष मदनगोपाल पुरोहित,सौ. सुषमा राजेंद्र शेटे, सौ. शितल सतीश शेळके, अनिल जगदेव सौदागर, अनिल देवआप्पा औटी आणि पंकज पंजाबराव इलग यांची निवड करण्यात आली.

पारदर्शक कारभारावर भर देणार : डॉ. आशुतोष गुप्ता

निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता म्हणाले की, "बँकेच्या हितासाठी आणि बँकेशी संलग्न असलेल्या सर्व घटकांना सोबत घेऊन आम्ही यापुढे काम करणार आहोत. आगामी काळात बँकेची आर्थिक शिस्त कायम राखण्यावर आणि सर्वसामान्य ठेवीदारांच्या पैशांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक कारभारावर आमचा विशेष भर असेल. सर्वांनी दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू."

बँकेचा प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यासाठी डॉ. गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील या नवीन मंडळाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या बिनविरोध निवडीमुळे बँकेची प्रशासकीय पकड अधिक मजबूत झाली असून, चिखली शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related to this topic: