Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > मुंबई

वांद्रे रेल्वे अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान गोंधळ; पोलिसांवर बाटल्या फेकल्या, सौम्य लाठीचार्ज

वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान बुधवारी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.


वांद्रे रेल्वे अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान गोंधळ पोलिसांवर बाटल्या फेकल्या सौम्य लाठीचार्ज

Bandra Encroachment |

मुंबई (Bandra Encroachment) : वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान बुधवारी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. कारवाईला विरोध करणाऱ्या काही जणांनी पोलिसांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगवली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला असून सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे.

वांद्रे परिसरातील रेल्वेच्या हद्दीतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई मानली जात आहे. पश्चिम रेल्वेकडून आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाद्वारे ही मोहीम राबवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी एका परदेशी ब्लॉगरने वांद्रे रेल्वेलाईनलगतच्या झोपडपट्टी अतिक्रमणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू झाली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली.

माहितीनुसार, वांद्रे रेल्वे हद्दीत तब्बल ५ हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे. यापूर्वीही अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र अतिक्रमणधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने आणि राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाईला अडथळा निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

गरीब नगर झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या या कारवाईला स्थानिकांनी विरोध दर्शवला. काही नागरिकांनी पोलिसांवर बाटल्या फेकल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमाव हटवला.

दरम्यान, परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली असून अतिक्रमण हटवण्याची कारवाई पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: