Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर

महागाव विषबाधा मृत्यू प्रकरणी आरोपी रोजा रामटेके यांना जामीन मंजूर

अहेरीजवळील महागाव विषबाधा मृत्यू प्रकरणातील आरोपी रोजा रामटेके यांना नागपूर खंडपीठाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह व आठ अटींसह जामीन मंजूर केला.


महागाव विषबाधा मृत्यू प्रकरणी आरोपी रोजा रामटेके यांना जामीन मंजूर

Bail Granted |

50 हजार रुपये जातमुचलक्यासह व आठ अटींसह जामीन

अहेरी (Bail Granted) : अहेरीपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावरील महागाव येथे नऊ जणांना जीवे मारण्याच्या उद्देशाने थॅलियम सल्फेट विष खाण्यापिण्यातून देऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपी, मृतकाची मामी रोजा रामटेके हिला नागपूर खंडपीठाकडून 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह व आठ अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी संघमित्रा हिला आता जामीन मिळणार का, याबाबत महागाव परिसरात चर्चा सुरू आहे. घटनेतील इतर आरोपींना यापूर्वी काही प्रमाणात दिलासा मिळालेला असून, एका आरोपीला मागील काही महिन्यांतच जामीन मिळाला आहे. तसेच ज्या कंपनीमार्फत ऑनलाईन विष मागवण्यात आले होते, त्या कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.

मृतकाची मामी रोजा रामटेके हिच्यावर अहेरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 374/2023 अंतर्गत भादंवि कलम 302, 366, 328, 221, 120-बी सह कलम 34 अन्वये गुन्हा नोंद आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीने 18 ऑक्टोबर 2023 रोजी अटकेनंतर प्रथमच 4 जानेवारी 2024 रोजी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता.

बचाव पक्षाने थेट पुरावा नसून आरोप परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असल्याचा युक्तिवाद केला, तर सरकारी पक्षाने संगनमत व पुराव्यांची साखळी असल्याचे सांगत अर्जाला विरोध केला. पाच जणांच्या मृत्यूचा गंभीर गुन्हा असल्याने पहिला जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला होता.

त्यानंतर आरोपीच्या वतीने 1 डिसेंबर 2025 रोजी नागपूर उच्च न्यायालयात पुन्हा जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता, मात्र काही कारणास्तव तो अर्ज मागे घेण्यात आला.

या प्रकरणातील एकमेव जिवंत साक्षीदार सागर कुंभारे याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही समोर आले असून, त्याच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आरोपींना जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने मांडला होता.

दरम्यान, विष पुरवणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. राज्यस्तरावर गाजलेल्या या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

30 एप्रिल रोजी नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयात, खटला दीर्घकाळ प्रलंबित असल्याने आरोपीला अनिश्चित काळ कारागृहात ठेवणे योग्य नसल्याचे नमूद करण्यात आले. 48 साक्षीदार असलेल्या या प्रकरणात केवळ गुन्ह्याच्या गांभीर्यावर आरोपीला दीर्घकाळ तुरुंगात ठेवता येत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती महेंद्र नेरलीकर यांनी नोंदवले.

त्यामुळे जाचक अटींसह रोजा रामटेके हिला जामीन मंजूर करण्यात आला. आरोपीतर्फे अॅड. बोधी रामटेके यांनी युक्तिवाद केला, तर शासनाच्या वतीने अॅड. चौके यांनी बाजू मांडली.

जामीनाच्या अटी :
आरोपीने महागावात प्रवेश करू नये, आठवड्यातून दर सोमवारी अहेरी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी, साक्षीदारांशी कोणताही संपर्क साधू नये, संपर्क पत्ता व मोबाईल क्रमांक पोलीस स्टेशनमध्ये द्यावा तसेच न्यायालयीन तारखांना अनिवार्य उपस्थित राहावे, अशा अटी न्यायालयाने घालून जामीन मंजूर केला आहे.

Related to this topic: