Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

शिक्षण विभाग प्रश्नपत्रिका

औंढा नागनाथ येथील शिक्षण विभागाला मिळाल्या प्रश्नपत्रिका

Education Department: औंढा नागनाथ पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गट साधन केंद्राला आग लागून १२ हजार पेपर जळाल्याची घटना घडली. पुणे येथून नवीन पेपर मागवण्यात आले


औंढा नागनाथ येथील शिक्षण विभागाला मिळाल्या प्रश्नपत्रिका

Education Department |

औंढा नागनाथ (Education Department) : येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गट साधन केंद्राला आग लागून संकलित मूल्यमापन चाचणीचे  १२ हजार पेपर जळाल्याची घटना  ८ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस झाली होती त्यानंतर गटशिक्षण अधिकारी शेख तोफिक यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथून पुन्हा प्रश्नपत्रिका पेपर मागवण्यात आले. सदरील (Education Department) प्रश्नपत्रिका चे पेपर १० एप्रील रोजी सकाळी नऊ वाजता औंढा नागनाथ येथील गट साधन केंद्रात प्राप्त झाल्या.

औंढा नागनाथ गटशिक्षणाधिकारी शेख तोफिक यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी संकलित मूल्यमापन चाचणीच्या प्रश्नपत्रिका औंढा नागनाथ तालुक्यातील सहा केंद्रातील केंद्रप्रमुखांना सकाळी ११ वाजता वाटप केल्या. आता (Education Department) विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणी परीक्षा सुरळीत पार पडणार आहेत.

Related to this topic: