Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

गट साधन केंद्र आग

औंढा नागनाथ गट साधन केंद्राला लागलेल्या आगीत १२ हजार मुल्यमापन चाचणीचे पेपर जळून खाक

Gat Saadhan Kendra fire: औंढा नागनाथ येथील गट साधन केंद्रात आगीची घटना घडली. यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने इयत्ता तीसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांचे चाचणीचे १२ हजार पेपर जळून गेले.


औंढा नागनाथ गट साधन केंद्राला लागलेल्या आगीत १२ हजार मुल्यमापन चाचणीचे पेपर जळून खाक

Gat Saadhan Kendra fire |

औंढा नागनाथ (Gat Saadhan Kendra fire) : येथील पंचायत समितीच्या गटसाधन केंद्र विभागात मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटने अचानक आग लागल्याची घटना घडली ही घटना बुधवारी सकाळी आठ वाजे दरम्यान उघडकी आली या आगीमध्ये इयत्ता तीसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांचे संकलित मूल्यमापन चाचणीचे अंदाजे १२ हजार पेपर जळून खाक झाले आहेत.

सकाळी आठ वाजता शिक्षण विभागातील कर्मचारी आले असता त्यांना घटना लक्षात आली. यानंतर तात्काळ कर्मचारी पांडुरंग सूर्यवंशी यांनी ही माहिती (Gat Saadhan Kendra fire) गटविकास अधिकारी गोपाळ कल्हारे पाटील, गटशिक्षणाधिकारी शेख तौसिफ यांना दिली यानंतर गट विकास अधिकारी कल्हारे पाटील, शिक्षण अधिकारी शेख, शिक्षण विस्तार अधिकारी संजय मेथेकर यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. परंतु रात्री आग लागल्याने रात्रीतून सर्व पेपर पूर्णतः जळून गेले होते. सदरील माहिती पोलीस व महावितरण कर्मचार्‍यांना दिली यानंतर पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, जमादार वकील पठाण, इकबाल शेख, तसेच महावितरण चे कर्मचारी प्रणव ढोबळे, सुमेध साळवे यांनी पंचनामा केला दरम्यान या घटनेत इयत्ता दुसरी ते साहावीच्या विद्यार्थ्यांचे संकलित मूल्यमापन चाचणीचे इंग्रजी मराठी व गणित या विषयाचे अंदाजे १२००० पेपर जळाले आहेत.

 मागील काही दिवसापासून सदरील पेपर केंद्रावर (Gat Saadhan Kendra fire) वाटपाचे काम सुरू होते यामध्ये सात केंद्रांना सदरील पेपर वाटप केले परंतु सहा केंद्राचे अद्याप पेपर वाटप राहिले होते यामध्ये सर्व अंदाजे १२००० पेपर जळाले आहेत त्यामुळे हे विद्यार्थी आता यापेपर पासून वंचित राहणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु मागील काही महिन्यापासून पंचायत समितीच्या विविध विभागाला शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटनेत वाढ होत आहे. त्यामुळे पंचायत समितीच्याच विभागाला का आग लागत आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

Related to this topic: