Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणीत किरकोळ वादातुन जीवघेणा हल्ला...?  पूर्णा तालुक्यातील गौर येथील घटना..!

गाडीचा धक्का लागण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादात एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना गौर येथील बस स्थानक परिसरात शुक्रवार दि.१७ एप्रिल रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घडली आहे.


परभणीत किरकोळ वादातुन जीवघेणा हल्ला  पूर्णा तालुक्यातील गौर येथील घटना

Attack Case |

परभणी (Attack Case) : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर या गावात वाढदिवस साजरा करत असतांना बाजूने जातांना गाडीचा धक्का लागण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादात एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना गौर येथील बस स्थानक परिसरात शुक्रवार दि.१७ एप्रिल रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घडली आहे.घटनेत फिर्यादी सुशील पारवे हे बस स्थानक परिसरातून आपल्या घराकडे जात होते यावेळी काही जण रस्त्यावर वाढदिवस साजरा करत होते. यावेळी फिर्यादी व वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकामध्ये वाद झाला.काहीतरी वाद सुरु आहे हे समजताच सुशील यांचा मित्र राम तेथे आला. याचवेळी वाढदिवस साजरा करणाऱ्या काही युवकांनी राम पारवे यांस गवत कापण्याच्या कत्तीने डोक्यात व चेहऱ्यावर जोरदार वार केले या हल्यात राम दिगंबर पारवे वय २४ वर्ष हा तरुण अति गंभिर जखमी झाला असून त्यांच्यावर नांदेड येथील गंगा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती कळताच चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनी सुशांत किनगे यांनी आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अधिक कुमक मागवली.

त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिहं परदेशीं,उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, एलसीबीचे पोलीस निरीक्षक भेट दिली व घटनेचा आढावा घेतला.यानंतर सपोनि सुशांत किंनगे,सपोनि स्वामी,सपोनि मोरे,पोउपनि.गुट्टे आदींनी परिस्थिती आटोक्यात आणली. यावेळी संतप्त जमावांनी एक स्कार्पिओ गाडी पेटवून दिल्याने काही काळ तणावाचे वातावरणात निर्माण झाले होते. त्यानंतर शनिवार सकाळी फॉरेनसिकच्या टीमने घटना स्थळी भेट देऊन पंचनामा करून हल्यावेळी वापरण्यात आलेली कत्ती ताब्यात घेतली आहे.

या प्रकरणी संतोष सावळे, सुजित सावळे,बालाजी सावळे, मंगेश सावळे, योगेश अंबोरे यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिते नुसार विविध कलमाखाली चुडावा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चुडावा पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून गौर गावाला शुक्रवारी मध्यरात्रीपासून गावात तणावपूर्ण शांतता असून  गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Related to this topic: