Breaking News
  • वाढत्या पेट्रोल दरांचा परिणाम? पेट्रोल चोरीच्या घटनांत वाढ
  • पश्चिम नागपुरात वारंवारच्या लोडशेडिंगने विरोधात कॉंग्रेसकडून मुख्य विद्युत भवन कार्यालयात जोरदार आंदोलन
  • पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे महिलेचा धारधार शास्त्राने वार करून खून
  • इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
  • नंदुरबार बाजार पेठेत गवारची आवक वाढल्याने गवारचे दर अचानक घसरले
  • कल्याणच्या दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीच्या मुद्द्यावर कल्याणमध्ये राजकारण तापले
  • शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर हल्लाबोल मोर्चा
  • नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

होम > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ

जुन्या वादातून वृद्धावर जीवघेणा हल्ला

पोलीस स्टेशन मारेगाव हद्दीतील एका गावात जुन्या वादाचे आणि अनैतिक संबंधाच्या संशयाचे पर्यवसान भीषण रक्तरंजित संघर्षात झाले आहे.


जुन्या वादातून वृद्धावर जीवघेणा हल्ला

Atrocity Case |

पारस्पर विरोधात विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

मारेगाव (Atrocity Case) : पोलीस स्टेशन मारेगाव हद्दीतील एका गावात जुन्या वादाचे आणि अनैतिक संबंधाच्या संशयाचे पर्यवसान भीषण रक्तरंजित संघर्षात झाले आहे. एका ६५ वर्षीय वृद्धाला जीवे मारण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या घटनेला वेगळे वळण देत दुसर्‍या गटाकडून संबंधित वृद्धाविरुद्ध विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रति-गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

एका ६५ वर्षीय वृद्धाचे गावातीलच एका महिलेशी संबंध असल्याच्या संशयावरून आरोपींनी त्यांना शेतात गाठले. तेथे धारदार शस्त्राने आणि लाकडी दांडक्याने त्यांच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात वृद्धाच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर जखमा झाल्या असून, ते सध्या चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे.

तर आरोपींच्या कुटुंबातील एका महिलेने पोलिसांत धाव घेत परस्पर विरोधी तक्रार दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, घटनेच्या रात्री त्या नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेल्या असता पीडित वृद्धाने त्यांचा साडी ओढून विनयभंग केल्याचा आणि मदतीला आलेल्या पती व दिराला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग व ?ट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून वणी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मारेगावचे पोलीस निरीक्षक शाम वानखेडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. पोलीस निरीक्षक शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रमोद जिद्देवार, एएसआय दिगंबर किनाके, पो.हवा. शंकर बारेकर आणि पो.का. संभाजी लेंनगुरे यांच्या पथकाने तपासाचे कौशल्य पणाला लावत, गुन्हा दाखल होताच काही वेळातच दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी  सुनावली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत

Related to this topic: