Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

5 kg किलो गांजासह अल्पवयीन ताब्यात; देऊळगाव राजात खळबळ

देऊळगाव राजा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५.०५० किलो गांजा जप्त केला आहे.


5 kg  किलो गांजासह अल्पवयीन ताब्यात देऊळगाव राजात खळबळ

Anti Drug Operation |

देऊळगाव राजा (Anti Drug Operation) : देऊळगाव राजा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५.०५० किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथे २४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास टाकरखेड भागिले शिवारातील गजानन महाराज हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार हनमत मोहोळकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

तेथे संशयास्पद हालचाली करत असलेल्या एका युवकाची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. तपासणीदरम्यान एकूण ५.०५० किलो गांजा जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची बाजारातील अंदाजे किंमत सुमारे १ लाख १ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपीकडून एक मोबाईल फोन (किंमत सुमारे १० हजार रुपये) देखील जप्त करण्यात आला असून, एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरू असून, अल्पवयीन संशयिताची चौकशी करण्यात येत आहे.

Related to this topic: