Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ

अकोटात बालिकेवर अत्याचार

अकोटातील अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार; जमानत अर्ज नामंजूर

तेल्हारा तालुक्यात एका १२ वर्षिय बालिकेवर तिच्या वडिलांसह इतर दोन जणांनी लैंगिक अत्याचार केला. न्यायालयाने तिन्ही आरोपींचा जमानत अर्ज नामंजूर केला.


अकोटातील अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार जमानत अर्ज नामंजूर

अकोट : तेल्हारा तालुक्यातील अल्पवयीन १२ वर्षिय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणारे आरोपी मंगेश वानखडे, प्रविण वानखडे व शेजारील गजानन भोम या तीनही आरोपींचा जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.आर. पठारे यांनी फेटाळून लावला.
तेल्हारा पोलिस स्टेशनच्या फाईलवरील आरोपी मंगेश पांडुरंग वानखडे (४७), प्रविण पांडुरंग वानखडे (३६) व ज्याला पिडीता आबा म्हणायची तो गजानन जयदेव भोम (६८) तिघेही रा. आडसुळ फाटा यांनी सातव्या वर्गात शिकणार्‍या १२ वर्षीय बालिकेवर सतत लैंगिक अत्याचार केलेल्या प्रकरणात दाखल केलेला तीनही आरोपींचा अटकपूर्व जमानत अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. सर्व आरोपी अकोला कारागृहात २५/१२/२०२५ पासून बंदीस्त आहेत. या प्रकरणात १२ वर्षिय अल्पवयीन पिडीतेवर तीचे वडील, तीचे काका व गजानन भोम या तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असल्याने तेल्हारा तालुक्यातील हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. सरकारी वकील अजित देशमुख यांनी जमानत अर्जाला विरोध करतांना लेखी उत्तर व युक्तीवाद सादर केला. पिडीतेच्या वैद्यकिय तपासणीमध्ये सुध्दा तीच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे नमूद आहे. सरकार पक्ष हा खटला आरोपीला कारागृहात ठेवून जलदगतीने चालविण्यास तयार आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेता आरोपींचा जमानत अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला. दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने तीनही आरोपींचा अटकपूर्व जमानत अर्ज नामंजूर केला. 

Related to this topic: