Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ

अकोल्यात ब्लॅकमेलिंगचा प्रकार

अकोला सिव्हिल लाइन पोलिसांकडून ब्लॅकमेलिंग प्रकारात तिघांना अटक

अकोला सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात ३ एप्रिलला घडलेल्या ब्लॅकमेलिंग, मारहाण व लूटमारीच्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली.


अकोला सिव्हिल लाइन पोलिसांकडून ब्लॅकमेलिंग प्रकारात तिघांना अटक

अकोला : सिव्हिल लाइन पोलीस ठाणे हद्दीत ब्लॅकमेलिंग, मारहाण व लूटमारीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पांडुरंग खेडकर (वय 54, रा. दालफैल, खामगाव, जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 309(4), 308(2), 115(2), 351(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजता घडली.

फिर्यादीस एका महिलेने फोन करून बोलावले. त्यानंतर त्यांना चारचाकी वाहनातून घुसर रोडवरील शौर्यवाडा हॉटेल येथे नेण्यात आले. तेथे एक पुरुष व एक वृद्ध महिला येऊन संबंधित महिला ही पत्नी व वृद्ध महिला सासू असल्याचा बनाव करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीस शेतात नेऊन जबरदस्तीने कपडे काढून महिलेसोबत फोटो व व्हिडिओ काढण्यात आले.

यानंतर आरोपींनी फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ केली व त्यांच्या हातातील सुमारे 7 ग्रॅम वजनाची, अंदाजे 35 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हिसकावून घेतली.

या प्रकरणी पोलिसांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे नितेश प्रभाकर थोप (40), लता नितेश थोप (35), दोघे रा. खरब ढोरे, ता. मूर्तिजापूर आणि लीलाबाई वसंतराव पाखरे (66), रा. संजय नगर, मोठी उमरी, अकोला यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मालती कायटे यांच्या आदेशानुसार पीएसआय शामली निकम व त्यांच्या पथकाने केली.


Related to this topic: