Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

ठाणे कनेक्शन उघड! अकोल्यात ड्रग्ज विक्रेता जाळ्यात

महाराष्ट्रात ‘झॉम्बी ड्रग्ज’च्या वाढत्या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये सर्वत्र भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


ठाणे कनेक्शन उघड अकोल्यात ड्रग्ज विक्रेता जाळ्यात

Akola Drug Bust |

अकोला (Akola Drug Bust) : महाराष्ट्रात ‘झॉम्बी ड्रग्ज’च्या वाढत्या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये सर्वत्र भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यात ‘ड्रग्ज’विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 68.43 ग्रॅम ‘ड्रग्ज’ जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत 13 लाख 80 हजार रुपये आहे.

अकोला शहरातील सिव्हिल लाईन परिसरात, नवीन बस स्थानकाच्या मागील भागात एक व्यक्ती ‘ड्रग्ज’ विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत मोहम्मद शफीक मोहम्मद जहीर शेख या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. तो मूळचा ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून 68.43 ग्रॅम ‘ड्रग्ज’ जप्त करण्यात आले असून एकूण 13 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अकोला पोलिसांनी ‘ड्रग्ज’विरोधात केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. तसेच या प्रकरणामागील मुख्य टोळीचा लवकरच पर्दाफाश करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related to this topic: