Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

एम्स रुग्णालयातील प्रकार

अखिलभारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचारापूर्वीची नोंदणी व इतर सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत आहे.


एम्स रुग्णालयातील प्रकार

AIIMS PROBLEMS |

ऑनलाईनमुळे रुग्णांची गैरसोय

गुमगाव (AIIMS PROBLEMS) अखिलभारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचारापूर्वीची नोंदणी व इतर सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत आहे. परंतु, प्रक्रियेची अंमलबजावणी करताना रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे. मोबाईल नेटवर्क ही मोठी समस्या आहे.

नेटवर्क सुविधेचा अभाव

रुग्णालय परिसरात मोबाईल नेटवर्कची गती मंद असते. ऑनलाईन नोंदणी, ओपीडी अपॉइंटमेंट, कागदपत्रांची अपलोडिंग, तपासणीसाठी लागणाऱ्या विविध प्रक्रिया पूर्ण करताना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची दमछाक होत आहे. अनेकदा वेबसाईट किंवा ॲप उघडण्यातच विलंब होतो, तर काही वेळा प्रक्रिया अर्धवट राहते. परिणामी, रुग्णांना वारंवार प्रयत्न कराव्या लागतात.

विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी ही समस्या अधिक गंभीर ठरत आहे. त्यांना ऑनलाईन प्रणालीची पूर्ण माहिती नसते, त्यातच नेटवर्कचा अभाव असल्याने गोंधळ उडतो.

अनेकांना इतरांची मदत घ्यावी लागते, तर काही वेळा एजंट किंवा बाहेरील व्यक्तींकडून मदत घ्यावी लागते, ज्यामुळे अतिरिक्त खर्चही करावा लागतोच शिवाय रुग्ण वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी रुग्णालय परिसरात नेटवर्क मिळवण्यासाठी इकडे-तिकडे भटकत असल्याचे चित्र वारंवार दृष्टिस पडत असते.

मजबूत मोबाईल नेटवर्क किंवा मोफत वायफाय सेवा द्यावी

रुग्णांच्या सोयीसाठीची ऑनलाईन प्रणाली आज घडीला अत्यंत उपयुक्त आहेत. मात्र, नोंदणी आणि अन्य ऑनलाईन प्रक्रियेसाठी रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेता एम्स प्रशासनाने रुग्णालय परिसरात मजबूत मोबाईल नेटवर्क सुविधा किंवा मोफत वायफाय सेवा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. तसेच, ऑनलाईन प्रक्रियेसाठी स्वतंत्र मदत केंद्र (हेल्पडेस्क) उभारल्यास रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो. रुग्णालय व्यवस्थापनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

Related to this topic: