Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

ज्ञानेश धनंजय कुलकर्णी यास पदवी प्रदान !

हिंगोली येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून तंत्रज्ञान पदवी, यंत्र अभियांत्रिकी ही पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली.


ज्ञानेश धनंजय कुलकर्णी यास पदवी प्रदान

Academic Achievement |

हिंगोली (Academic Achievement) : येथील आदर्श महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व प्रा. धनंजय कुलकर्णी यांचे सुपुत्र चि. ज्ञानेश धनंजय कुलकर्णी यांनी मुंबईतील प्रसिद्ध एमईटी व्यवस्थापन महाविद्यालय, वांद्रे येथून प्रबंधक व्यवसाय व्यवस्थापन, कार्यसंचालन या शाखेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

हिंगोली येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून तंत्रज्ञान पदवी, यंत्र अभियांत्रिकी ही पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. त्यानंतर मुंबईतून प्रबंधक व्यवसाय व्यवस्थापन, कार्यसंचालन शाखेत सर्वप्रथम येत त्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

नुकताच वांद्रे, मुंबई येथील एमईटी परिसरात आमदार पंकज भुजबळ व प्रसिद्ध उद्योजक डॉ. ए. वेलुमनी यांच्यासह व्यवस्थापन मंडळाच्या प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत पदवीदान समारंभ संपन्न झाला. या समारंभात ज्ञानेश यांचा विशेष गौरव करण्यात आला.

सध्या ज्ञानेश कुलकर्णी सोलापूर येथील जीआरपी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सहायक व्यवस्थापक या उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल हिंगोली परिसरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related to this topic: