हिंगोली विराट मुकाडे

राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत हिंगोलीच्या विराटची दैदीप्यमान कामगिरी 

Hingoli Virat Mukade: नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत हिंगोलीच्या विराट मुकाडे यांनी 60 मिटर धावणे प्रकारात दुसरा स्थान पटकावून सिल्व्हर मेडल जिंकला.

राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत हिंगोलीच्या विराटची दैदीप्यमान कामगिरी 

Hingoli Virat Mukade

हिंगोली (Hingoli Virat Mukade) : नाशिक येथे पार पडलेल्या  राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत हिंगोली येथील विराट मुकाडे यांनी 60 मिटर धावणे या क्रीडा प्रकारात उत्कृष्ठ कामगिरी बाजावत सिल्व्हर मेडल पटकावत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.

 हिंगोली येथील विराट रमेशचंद्र मुकाडे (Hingoli Virat Mukade) हा उद्योनमुख खेळाडू असून आजपर्यंत अनेक पारितोषिक पटकावले आहेत. नुकत्याच 26 जानेवारी येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. उत्कृष्ठ धावपट्टू म्हणून तो जिल्ह्याचे नाव लोकीक करणार आहे. त्यानुसार नाशिक येथे दोन व तीन मे रोजी नाशिक अथलेटिक्स फाउंडेशन तर्फे आयोजित चौथ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलात पार पडल्या. यामध्ये बारा वर्ष वयोगटात 60 मिटर धावणे या क्रीडा प्रकारात विराट मुकाडे यांनी चमकदार कामगिरी करीत दुसरा क्रमांक पटकावला त्याबद्दल  त्याला सिल्व्हर मेडल, प्रमाण पत्र देऊन संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आले. आता सहा मे रोजी पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी येथे निवड चाचणी साठी विराट मुकाडे याची निवड झाली आहे.

त्याच्या या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी  महेंद्र कुमार कांबळे, अनिल माचेवाड, अप्पासाहेब पाटील, अभिमन्यू बोधवड, क्रीडा अधिकारी बोथीकर, यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026