हिंगोली फटाका छापेमारी

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid

हिंगोली (Hingoli Firecracker Raid) : हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर अखेर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

या (Hingoli Firecracker Raid) दुर्घटनेने हिंगोलीकरांमध्ये संतापाची लाट उसळल्यानंतर महसूल आणि नगरपालिका प्रशासनाने मंगळवार ६ ऑक्टोबर रोजी शहरात धडक कारवाई सुरू केली. प्रशासनाने शहरातील ७ ठिकाणी छापे मारले असता, ४ ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे फटाक्यांचा साठा करून ठेवल्याचे आढळून आले. हा साठा तात्काळ जप्त करण्यात आला आहे. दोन निष्पापांचा जीव गेल्यानंतर आणि बारा जण जखमी झाल्यानंतर प्रशासनाला उशिरा जाग आली असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. जर हीच कारवाई आधी केली असती तर कदाचित दोन जीव वाचले असते, अशी हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान महसुल व नगर पालिका प्रशासनाने ७ ठिकाणी छापे मारले. ज्यामध्ये ४ ठिकाणी फटाक्यांची साठवणूक केल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून १ हजार ३९० किलो फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित चार जणांविरूध्द नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या फटाक्यांचा साठा नियमानुसार नष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

 फायर ऑडिट करणे गरजेचे
हिंगोली शहराच्या जुन्या वस्ती मधील रस्ते आजही अत्यंत अरुंद आहेत. काल झालेल्या अग्नी खंडाच्या या घटनेप्रमाणे पुन्हा कधी जुन्या शहरात अशी घटना घडल्यास मोठे अग्निशामक वाहन नेता येत नाही. यावर छोट्या वाहनांवर बसविलेले अग्निशामक अत्यंत उपयोगी ठरू शकतात. याकरिता नगरपालिका व जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे एकदा सबंध शहराचे फायर ऑडिट करणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांमुळे अग्निशामक वाहनांसाठी रस्ता शिल्लक राहिलेला नाही. यामुळे ही भविष्यात एखादी आणखी मोठी दुर्घटना होण्याची भीती आता नागरिकांतून व्यक्त होत आहे.