Breaking News
  • राम चरणच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज; ‘पेड्डी’चा दमदार टीझर प्रदर्शित
  • सावधान!!...नाहीतर देशात लॉकडाऊन लागू होणार?
  • आयपीएल 2026: 'या' 5 दिग्गज खेळाडूंना 'जीरो से हीरो' बनण्याची संधी!
  • आयपीएल 2026: संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पहिल्याच दिवशी RCB Vs हैदराबाद
  • नेपाळचे नवे पंतप्रधान: बालेन्द्र शाह आज शपथबद्ध
  • डिजिटल मोबाईल अँपच्या माध्यमातून होणार 2027 ची जनगणना
  • महाराष्ट्राचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
  • आता दुचाकीसाठी मिळणार फक्त 200 रुपयांचे पेट्रोल
  • नोरा फतेहीच्या 'सरके चुनरिया' या गाण्याविरोधात सरकारची मोठी कारवाई

होम > महाराष्ट्र

लिंबाच्या किमतीत वाढ

Lemons Price Hike: लिंबू झाले ‘कडू’; अतिवृष्टीचा फटका, दर २०० रुपये किलोवर!

सेनगावमध्ये अतिवृष्टीमुळे लिंबाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे, ज्यामुळे किमती २०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्या आहेत.


lemons price hike लिंबू झाले ‘कडू’ अतिवृष्टीचा फटका दर २०० रुपये किलोवर

सेनगाव (Lemons Price Hike) : निसर्गाचा लहरीपणा आणि पावसाळ्यातील अतिवृष्टीचा मोठा फटका सेनगाव तालुक्यातील लिंबू उत्पादनाला बसला आहे. एरवी स्वस्त मिळणारे लिंबू सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून, बाजारात (Lemons Price Hike) लिंबाने २०० रुपये किलोचा विक्रमी टप्पा गाठला आहे. किरकोळ बाजारात एका लिंबासाठी ग्राहकांना चक्क १० रुपये मोजावे लागत असल्याने, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लिंबू ‘कडू’ झाल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.

सेनगाव तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी आता नगदी पीक म्हणून भाजीपाला आणि (Lemons Price Hike) लिंबू उत्पादनाकडे काही प्रमाणात वळले आहेत. मात्र, यावर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे लिंबू झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. फुलोरा गळाल्याने आणि झाडांना फळधारणा कमी झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. दिवाळीच्या काळात जो बहार अपेक्षित होता, त्याला पावसाने झोडपून काढल्याने आता बाजारपेठेत (Lemons Price Hike) लिंबाचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे, पण पुरवठा मात्र घटला आहे. सध्याचे बाजार भाव असे आहेत.

वाढलेल्या या दरांमुळे गृहिणींचे किचन बजेट कोलमडले असून हॉटेल व्यावसायिक, रसवंती चालक आणि सामान्य ग्राहकांनी (Lemons Price Hike) लिंबाचा वापर अत्यंत मर्यादित केला आहे.

रसवंती चालक अन् रसविक्रेते अडचणीत

सध्या उन्हाळा तापू लागल्याने ठिकठिकाणी रसवंती गृहे आणि उसाच्या रसाची दुकाने सज्ज झाली आहेत. उसाच्या रसात चवीसाठी (Lemons Price Hike) लिंबाचा वापर अनिवार्य असतो, मात्र १० रुपयांना एक लिंबू पडत असल्याने रसवंती चालकांना नफा मिळवणे कठीण झाले आहे. सेनगावच्या आठवडी बाजारात जिंतूर, रिसोड आणि इतर भागांतून येणाऱ्या लिंबाची आवकही निम्म्याहून अधिक घटली आहे.

पहिला बहार पावसाने हिरावला असला तरी, सध्या झाडांना दुसरा बहार लागला आहे. हे उत्पादन एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये आवक वाढली तरच दर कमी होतील आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल भाजीपाला उत्पादनाकडे वाढत असला, तरी हवामान बदलाचा मोठा अडसर निर्माण होत आहे. नगदी पीक व घरगुती वापरासाठी अल्पशा लिंबाच्या झाडांपासून शेतकऱ्यांना थोडा आर्थिक आधार मिळतो मात्र (Lemons Price Hike) लिंबाने यंदा शेतकऱ्यांची आणि ग्राहकांचीही परीक्षा पाहायला सुरुवात केली आहे.

“अतिवृष्टीमुळे लिंबाचे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांना केवळ शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही, तर शेतीला जोडधंद्याची नितांत गरज आहे. तरच शेतकऱ्यांचा आर्थिक आलेख उंचावेल. आता एप्रिलमधील बहराकडून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.”
 

Related to this topic: