Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > महाराष्ट्र

अभिनेत्री हर्षिल कालिया

प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू; चाहत्यांना मोठा धक्का

Actress Harshil Kalia: मुंबईमध्ये राजस्थानी मॉडेल आणि अभिनेत्री हर्षिल कालिया यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने इंडस्ट्री आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला.


प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू चाहत्यांना मोठा धक्का

Actress Harshil Kalia |

मुंबई (Harshil Kalia Death) : मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. राजस्थानी मॉडेल आणि प्रसिद्ध अभिनेत्री हर्षिल कालिया यांचे एका भीषण रस्ते अपघातात निधन झाले आहे. या दुःखद घटनेने इंडस्ट्री आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. माहितीनुसार, हा भीषण अपघात मंगळवार रात्री उशिरा जयपूरमधील शिप्रा पथ रोडवर घडला. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षिल तिच्या कारमधून घरी परतत असताना अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार भरधाव वेगाने डिव्हायडरला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कार उलटली.

रुग्णालयात दाखल करताच मृत घोषित

घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, कारवरील नियंत्रण सुटले आणि ती उलटली. उपस्थित लोकांनी तात्काळ मदत करून कार सरळ केली आणि (Actress Harshil Kalia) हर्षिल कालिया यांना बाहेर काढले, पण तोपर्यंत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर लगेचच हर्षिल कालियाला जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाला.

मॉडेलिंग आणि अभिनयात नावलौकिक मिळवणारी

हर्षिल कालियाने (Actress Harshil Kalia) अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली होती. ती 'क्राईम नेक्स्ट डोअर' या वेब सीरिजमध्ये दिसली होती आणि तिने अनेक राजस्थानी म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले होते. मॉडेलिंग आणि सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग होता.

Related to this topic: