पुलगाव अपघाती मृत्यू

समोरासमोरच्या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू; तीन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

Pulgaon Accidental Death: वर्धा जिल्ह्यातील पुलगाव-आर्वी मार्गावर दुचाकी धडकेत तीन व्यक्ती जागीच मृत झाले. यात योगेश मेश्राम, देवेंद्र दरणे, आणि गंगाधर दरणे यांचा समावेश आहे.

समोरासमोरच्या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू; तीन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

Pulgaon Accidental Death

 

लग्नपत्रिका देऊन परतताना काळाने घातला घाला

पुलगाव/विरूळ (Pulgaon Accidental Death) : वर्धा जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एक हृदयद्रावक अपघात घडला. कुणी काम आटोपून घरी परतत होते, तर कुणी नातलगांना लग्नाचे आमंत्रण देऊन आनंदाने गावाकडे निघाले होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पुलगाव-आर्वी मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसर सुन्न झाला असून तीन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Pulgaon Accidental Death) मृतांमध्ये योगेश रामकृष्ण मेश्राम (रा. सालफळ), देवेंद्र त्र्यंबक दरणे आणि गंगाधर पंढरीनाथ दरणे (दोघेही रा. दरणे-टाकळी) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सालफळ येथील ग्रामपंचायत कर्मचारी योगेश मेश्राम हे एमएच 40 बीयू 2274 क्रमांकाच्या दुचाकीने देवळी येथे पेपर संपवून आपल्या गावी परतत होते. तर देवेंद्र दरणे आणि गंगाधर दरणे हे एमएच 32 एव्ही 8455 क्रमांकाच्या दुचाकीने रोहणा येथे नातलगांकडे लग्नपत्रिका देऊन आनंदाच्या वातावरणात परतीच्या प्रवासाला निघाले होते. दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. (Pulgaon Accidental Death) धडक एवढी भीषण होती की (Pulgaon Accidental Death) तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. काही क्षणांत आनंदाचा प्रवास मृत्यूच्या काळोखात बदलला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेल्या दुचाकी, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आणि आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या (Pulgaon Accidental Death) दुर्दैवी घटनेमुळे सालफळ आणि दरणे-टाकळी गावांमध्ये शोककळा पसरली असून हसत-खेळत घराबाहेर पडलेले तिघेही पुन्हा कधीच परतणार नाहीत, या वास्तवाने नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
मोकळ्या जंगलातून जाळीत अडकला बिबट्या; वन विभागाच्या तत्परतेने वाचला जीव

मोकळ्या जंगलातून जाळीत अडकला बिबट्या; वन विभागाच्या तत्परतेने वाचला जीव

मोकळ्या जंगलात मुक्तपणे वावरणारा बिबट्या अचानक संरक्षक जाळीत अडकला. बाहेर पडण्यासाठी त्याची सुरू असलेली धडपड पाहून परिसरात चिंता निर्माण झाली.

Aug 29, 2026
विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

Accidental death: नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला,तर कारमधील दोन प्रवासी..

Aug 25, 2026
छतावर वडील, जिन्यावर आई-मुलगी, पलंगाखाली मुलाचा मृतदेह!

छतावर वडील, जिन्यावर आई-मुलगी, पलंगाखाली मुलाचा मृतदेह!

Bangladesh Hindu Family Death: बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये निवृत्त शाळा शिक्षक

Aug 24, 2026
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

National Highway Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर  अज्ञात वाहनाने पायदळ चालणार्‍या इसमास जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. 

Aug 23, 2026